Pune Crime News | शिवाजीनगर न्यायालयात महिलेला मारहाण; वकिलासह चौघांवर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | कौटुंबिक हिंसाचाराची केस (Domestic Violence Case) मागे घ्यावी, यासाठी महिलेला शिवाजीनगर न्यायालयाच्या (Pune Shivaji Nagar Court) बाहेर शिवीगाळ करुन मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी वकिलासह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

 

याबाबत एका २१ वर्षाच्या महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station Pune) फिर्याद (गु. रजि. नं. १४७/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गणेश पवार, नंदु पवार, अंजली मोरे आणि अ‍ॅड. सुनील कडसकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शिवाजीनगर न्यायालयातील पत्रावळे कोर्टाचे बाहेर असलेल्या वरंड्यामध्ये शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता घडला.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
फिर्यादी यांच्या घराच्याविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा चिखली पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली होती.
त्यानुसार गुन्हा दखल करण्यात आला होता.
या खटल्याच्या तारखेसाठी त्या न्यायालयात आल्या होत्या.
त्यावेळी कोर्टाचे बाहेर असताना वकील सुनिल कडसकर व पती गणेश पवार याने फिर्यादी यांना केस मागे घे,
म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. सासरे नंदु पवार याने फिर्यादीस अश्लिल शिवीगाळ केली.

नणंद अंजली मोरे हिने फिर्यादीचे केस ओढुन मारहाण केली तसेच शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सहायक पोलीस निरीक्षक अहिवळे (API Ahiwale) तपास करीत आहेत.

 

 

Web Title : Pune Crime News | Woman assaulted in Shivajinagar court; A case has been registered against four people including the lawyer

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा