Pune Crime News | येरवडा: खंडणी देण्यास नकार दिल्याने हॉटेल व्यावसायिक महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन नेली हिसकावून; तिघा गुंडांनी केली हॉटेलमध्ये तोडफोड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | दर महिना ५ हजार रुपये खंडणी (Ransom Case) देण्यास नकार दिल्याने गुंडाने हॉटेलचालक महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्यांची सोन्याची चैन (Gold Chain) जबरदस्तीने हिसकावून घेतली. गुंडाच्या साथीदारांनी हॉटेलमधील सामानाची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी येरवडा पोलिसांनी (Pune Police) अखिल / ब्रिटीश अनिल पालांडे Akhil / British Anil Palande (वय २५, रा. माणिक कॉलनी, धानोरी गाव, विश्रांतवाडी) याला अटक केली आहे. ओंकार टिंगरे (वय २६) व त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत 51 वर्षीय महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६१३/२३) दिली आहे. हा प्रकार विमाननगरमधील जे एम डी फास्ट फुड हॉटेलमध्ये (JMD Fast Food Hotel Vimannagar) बुधवारी सकाळी साडेआठ वाजता घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे जे एम डी फास्ट फुड हॉटेल आहे.
अखिल पालांडे हा सराईत गुंड असून त्याने फिर्यादीकडे प्रत्येक महिन्याला ५ हजार रुपये हप्ता (Extortion Case) मागितला
होता. त्याला फिर्यादी यांनी नकार दिला होता.
तो आपल्या साथीदारांसह हॉटेलवर आला. प्रत्येक महिन्याला ५ हजार रुपये द्यायचे म्हणून सांगितले होते ना,
मग का नाही दिले़ तुम्हाला माहिती आहे ना मी इथला किती मोठा गुंड आहे, आताच्या आता ५ हजार रुपये द्या नाही तर
मी तुमचे हॉटेल फोडून टाकेल व यापुढे देखील हॉटेल चालवायचे असेल तर मला महिन्याला पैसे द्यायचे लक्षात ठेवा
अशी धमकी दिली. तरीही हॉटेल चालक महिलेने पैसे देण्यास नकार दिला.

तेव्हा त्याने त्यांना हाताने मारहाण (Beating) करुन त्यांच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाची सोन्याची चैन जबरदस्तीने
ओढून घेतली, पैसे देत नाही ना तर, चैन घेऊन जातो, असे म्हणून तो हॉटेलच्या बाहेर जाऊ लागला.
त्याच्या दोन साथीदारांनी हॉटेलवर ठेवलेले सर्व सामानाची तोडफोड करुन दर महिन्याला पैसे देत नाही ना,
तुम्हाला बघून घेतो, सोडणार नाही अशी धमकी दिली. त्यानंतर ते तिघे निघून गेले.
पोलिसांनी गुंड अखिल पालांडे याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक गायकवाड (PSI Gaikwad) तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

National Nutrition Week 2023 | आजी-आजोबांच्या ताटात असावेत ‘हे’ ५ पोषकतत्‍व, एक्‍सपर्टकडून जाणून घ्या, कशी घ्यावी त्यांच्या न्‍यूट्र‍िशनची काळजी