Pune Crime News | झोन-2 च्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्याकडून शहरातील 2 सराईत गुन्हेगार तडीपार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | खुनाचा प्रयत्न, दुखापत, चोरी, चैन स्नॅचिंग, विनापरवाना शस्त्र बाळगणे, मालमत्तेचे नुकसान करणे, दहशत निर्माण करणे, मारहाण यासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पुणे शहरातील दोन सराईत गुन्हेगारांना तडीपार (Pune Crime News) करण्यात आले आहे. परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील (DCP Smartana Patil) यांनी गुन्हेगारांच्या तडीपारीचे सोमवारी (दि.27) आदेश काढले आहेत.

परिमंडळ दोन मधील कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातील (Koregaon Park Police Station) रेकॉर्डवरील गुन्हेगार सनी संजय सपकाळ (वय-24 रा. संत गाडगे महाराज वसाहत, कोरेगाव पार्क) आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या (Bharti Vidyapeeth Police Station) हद्दीतील मिथुन भरत बिरामणे (वय-25 रा. अष्टविनायक नगर, आंबेगाव पठार, पुणे) अशी तडीपार (Tadipaar) करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ( Pune Crime News)

गंभीर गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कायद्याचा दबाव राहावा यासाठी कोरेगाव पार्क आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police Act) कलम 56 नुसार कारवाई करण्याचा प्रस्तावर पोलीस उपायुक्तांकडे पाठवला होता. या प्रस्तवाची चौकशी करुन पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी आरोपींना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश दिले.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(Joint CP Sandeep Karnik) अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे
(Addl CP Rajendra Dahale) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
यापुढील काळात परिमंडळ दोनच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर अशाच प्रकारची कारवाई केली जाणार
असल्याचे पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सांगितले.

Web Title :- Pune Crime News | Zone-2 Deputy Commissioner of Police Smartana Patil Action On Two criminals

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Raigad Crime News | पोलादपूरमध्ये 55 वर्षीय व्यक्तीची नैराश्याच्या भरात आत्महत्या

Pune Crime News | एक्स्ट्रा चार्जेस कमी करुन घेणे पडले महागात; टीम व्हिव्हर अ‍ॅप डाऊनलोड करायला सांगून केली फसवणूक

Maharashtra Budget Session 2023 | शिवसेनेनं बजावला 55 आमदारांना व्हीप, भास्कर जाधवांचे टीकास्त्र म्हणाले- ‘अशा व्हीपला आम्ही भीक घालत नाही’