Pune Crime | प्रेमात अडथळा ठरण्याऱ्या प्रियकराच्या पत्नीचा प्रेयसीने केला खून; पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना

पुणे: पोलीसनामा ऑनलाइन – प्रेमात अडथळा ठरणाऱ्या प्रियकराच्या पत्नीचा प्रियसीने (Pune Crime) चक्क खून केल्याची घटना खेड तालुक्यात घडली आहे. पोलिसांनी आरोपी प्रेयसीला ताब्यात घेतले असून, तिला 24 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी (Pune Crime) मिळाली आहे.

कोमल गणेश केदारी Komal Ganesh Kedari (वय 28, रा. राजगुरुनगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर स्वाती सुभाष रेंगडे Swati Subhadh Rengade (वय 21) असे आरोपीचे नाव असून, तिचे मृत कोमल केदारी यांचे पती गणेश केदारी (Ganesh Kedari) याच्यासोबत काही वर्षांपासून अनैतिक प्रेमसंबंध होते. या दोघांमध्ये कोमल वरुन अनेकवेळा वाद होत असत. याच रागातून स्वातीने बुधवार (दि. 16 नोव्हेंबर) रोजी गणेश घरी नसताना घरात घुसून कोमलचा गळा दाबून खून केला.

कामावरुन घरी आल्यायावर गणेशला सर्व प्रकार कळाला आणि याप्रकरणी कोमलचा पती गणेश केदारी याने
खेड पोलीस ठाण्यात (Khed Police Station) आपल्या पत्नीचा खून झाल्याची तक्रार दिली.
कोमलच्या शवविच्छेदनानंतर (PM) तिचा गळा आवळून खून झाल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्यातील संशयीत स्वाती रेंगडे हिला जुन्नर मधून ताब्यात घेतले.
स्वातीने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी तिला काही गोष्टींचे ‘आश्वासन’ दिले आणि
तिने गुन्हा कबूल केला. आमच्या प्रेमात कोमल अडथळा ठरत असल्याने खून केला असल्याचे स्वातीने सांगितले.
या प्रकरणाचा अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.

Web Title :- Pune Crime | obstacle in love husband lover end life of his wife khed police station pune crime news