Pune Crime | पुणे : पत्नीचा खून करणार्‍या पतीला जन्मठेप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | कौटुंबिक वादातून पत्नीचा खून केल्याप्रकरणी एकाला न्यायाधीश पी.पी. जाधव यांनी जन्मठेप आणि 5 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. विनोदकुमार केहरसिंग बंजारा (35, रा. कासार अंबोली, मुळशी. मुळ रा. उत्तरप्रदेश) असे शिक्षा सुनावलेल्याचे नाव आहे. (Pune Crime)

विनोदकुमारने दि. 19 फेब्रुवारी 2017 रोजी कासार अंबोली येथे कौटुंबिक वादातून डोक्यात टिकाव मारून पत्नी सुनितादेवी बंजारा (28) हिचा खून केला होता. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिस दलामधील पौड पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी विनोदकुमार आणि त्याची पत्नी सुनितादेवी हे वीटभट्टीवर काम करत होते. सुनितादेवीच्या खूनप्रकरणी वीटभट्टीमालक रमेश बंडू कांबळे (60, रा. कासारअंबोली) यांनी फिर्याद दिली होती. या खटल्यात सरकार पक्षाकडून सरकारी वकील चंद्रकिरण साळवी यांनी बाजू मांडली तर तत्कालीन पोलिस निरीक्षक मनोज यादव आणि उपनिरीक्षक एन.एस. मोरे यांनी गुन्हयाचा तपास केला होता. (Pune Crime)

न्यायालयीन कामकाजात सहाय्यक उपनिरीक्षक (एएसआय) बी.बी. कदम, विद्याधर निचित, सहाय्यक निरीक्षक अर्जुन घोडेपाटील यांनी मदत केली. साक्ष आणि पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने विनोदकुमारला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. (Pune Court News)

Web Title :-  Pune Crime | pune court life imprisonment to husband for wife murder court news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP Chief Sharad Pawar | गटबाजीचा पक्षाला फटका, कार्यकर्त्यांनी केली थेट शरद पवारांकडे तक्रार; केली ‘ही’ मागणी

Supriya Sule | सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली खंत; म्हणाल्या ‘राजकारणात सक्रिय महिलांबाबत…’

Rohit Pawar | ‘#जी’ वरून चंद्रशेखर बावनकुळे आणि रोहित पवार यांच्यात रंगलं ट्वीटरवॉर