Pune Crime | पुण्यात अवैध धंदे चालु देण्यासाठी गुन्हे शाखेतील पोलिस अधिकारी-अंमलदार Protection Money स्वरूपात पैसे स्विकारताहेत; अति वरिष्ठांनी करून दिली मुंबईतील व.पो.नि. विरूध्दच्या खंडणीच्या गुन्ह्याची आठवण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (नितीन पाटील) – Pune Crime | शहरात कुठेही अवैध धंदे (Illegal Trade) चालु देऊ नका, तसे आढळल्यास संबंधित पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकास कठोर कारवाईस सामोरे जावे लागेल असा सज्जड दम पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) आणि सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे (Jt CP Dr. Ravindra Shisve) यांनी यापुर्वीच वेळावेळी क्राईम मिटींगमध्ये (Pune Crime Meeting) दिलेला आहे. त्यानंतर देखील पुणे शहर पोलिस (Pune Police) दलातील काही ‘गुणवंत’ पोलिस अधिकारी (Police Officers) आणि पोलिस अंमलदार, कर्मचारी (Police Constable) हे अवैध धंदे चालु ठेवण्यासाठी संबंधितांकडून प्रोटेक्शन मनी (Protection Money) स्वरूपात पैसे स्विकारण्याचे गैरप्रकार (Pune Crime) करत असल्याची सविस्तर माहिती सह पोलिस आयुक्तांना मिळाली आहे. त्यामुळे त्यांनी सर्वांनाच मुंबईत (Mumbai) वरिष्ठ पोलिस निरीक्षकाविरूध्द दाखल झालेल्या खंडणीच्या गुन्ह्याची (Extortion Case) आठवण करून देत गर्भित इशाराच (Serious Warning) दिला आहे.

 

पोलिस अधिकारी व अंमलदार करत असलेल्या गैरप्रकाराची गंभीर दखल घेत सह पोलिस आयुक्तांनी सर्वांची झाडाझडती घेणार असल्याचं स्पष्ट करत सर्व संबंधितांना त्याबाबत लेखी आदेशाव्दारे सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांपासुन शहरात काही भागांमध्ये अवैध धंदे बोकाळल्याचं चित्र पहावयास मिळत आहे. अशातच गुन्हे शाखेतील (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागातील (Social Security Cell, Pune) अधिकारी तसेच अंमलदार हे अस्थापना अवैधरित्या चालण्यासाठी प्रोटेक्शन मनी स्वरूपात पैसे घेत असल्याचे गैरप्रकार करत असल्याची सविस्तर माहिती सह आयुक्तांना प्राप्त झाली आहे.

 

 

गुन्हे शाखेतील काही पोलिस अधिकारी व अंमलदार हे काही ठिकाणी छापे (Police Raids) टाकण्याच्या नावाने पैसे उकळणे (Ransom), तडजोडी करणे हे प्रकार करीत असल्याची माहिती देखील सह आयुक्तांना मिळाली आहे. त्यामुळे सह आयुक्तांनी गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्त (Additional CP Crime), उपायुक्त (DCP Crime), दोन्ही सहाय्यक आयुक्त (ACP – 1 आणि ACP -2) तसेच क्राईम ब्रँचमधील सर्व युनिट व विभागाच्या प्रभारी अधिकार्‍यांना लेखी आदेश (Order By Jt CP Dr. Ravindra Shisve) देऊन संबंधितांचा आढावा घेवून तात्काळ प्रतिबंध करण्यासंदर्भात उपाययोजना कराव्यात असं बजावलं आहे. अशा प्रकारचे गैरप्रकार कोणत्याही परिस्थितीत चालू राहणार नाहीत याची जबाबदारी घेण्याबाबत देखील गुन्हे शाखेतील सर्वच अधिकार्‍यांना सुचित करण्यात आलं आहे. (Pune Crime)

 

जे अर्ज आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या Economic Offences Wing Pune (EoW Pune) अखत्यारित येतात अशा अर्जाची चौकशी करून त्यामध्ये पैसे उकळणे आणि तडजोडी करण्याच्या प्रकाराची चर्चा होत आहे (Pune Cyber Police). खंडणी विरोधी पथकासंदर्भात अशा तक्रारी प्राप्त होत असून संबंधितांची दप्तर तपासणी करून चौकशी करावी तसेच आढावा घ्यावा असा आदेश सह आयुक्तांनी दिलेला आहे. गुन्हे शाखेतील संबंधित अधिकार्‍यांकडे कोणते पोलिस अंमलदार कामकाज करताहेत याबाबतची सविस्तर माहिती अति वरिष्ठांना समजल्याचं सह आयुक्तांनी काढलेल्या आदेशावरून दिसून येतंय.

 

गुन्हे शाखेच्या अति संवेदनशील विभागातील अंमलदाराकडून होतंय ‘समाधान’

गुन्हे शाखेतील अति संवेदनशीन विभाग म्हणून ‘टीएडब्ल्यू’कडे Technical Analysis Wing Pune (TAW) पाहिलं जातं. मात्र, सध्या त्याच विभागातील एका अंमलदारानं क्रिकेटमधील ‘सचिन’ सारख्या ‘धावा’ गोळा करण्यासाठी ‘कदम-‘कदम’ बढाये जाय हे’ धोरण स्विकारलं असून ‘कोकरू’ जसं उड्या मारतंय तशा उडया मारण्यास सुरूवात केली आहे. जुनी ‘पुण्याई’ उपयोगास आणुन अत्यंत संवेदनशील असलेल्या विभागात चंचु प्रवेश केल्यानंतर क्रिकेटमधील ‘सचिन’ सारखे मोठं-मोठं फटके मारण्यास सुरूवात केली आहे. ‘सलेक्टरां’ना खुश ठेवण्यासाठी आपले राजकीय संबंध देखील एखाद्या ‘दादा’सारखे ‘मजबूत’ असल्याचं गावभर सांगणार्‍या ‘सचिन’नं अनेक आस्थापना अवैधरित्या चालु देण्यासाठी ‘स्टेट ड्राईव्ह’ मारण्यास सुरूवात केली आहे. पुणे ग्रामीण पोलिस (Pune Rural Police) दलातून काही महिन्यांपुर्वीच पुणे शहर पोलिस दलात (Pune City Police) समाविष्ठ झालेल्या लोणीकंद (Lonikand) आणि लोणीकाभोर (Lonikalbhor) येथील मैदानावर सध्या ‘सचिन’ जोरदार सराव करत असल्याची ‘खमंग’ चर्चा पोलिस दलात सुरू आहे.

 

 

दरम्यान, अति संवेदनशील विभागातीलच अंमलदार दमदार ‘बॅटिंग’ करत असल्यानं संपुर्ण शहराचा ‘सवता सुभा’ असणार्‍या सामाजिक सुरक्षा विभागातील (SS Cell, Pune) ‘अण्णा’नं देखील ‘मान’पान दाखवत ‘फुल फॉर्म’मध्ये कामकाज रेटण्याचं ध्येय ठेवल्याची चर्चा सध्या होत आहे. ‘मान’पान दाखविण्यासाठी अण्णाच्या जोडीला सामाजिक सुरक्षा विभागातीलच ‘मोहित’पानं देखील ‘प्रमो’ला दाखविण्यात येतं आहे. मात्र, गुन्हे शाखेतील कामकाजाची सविस्तर माहिती समजल्यानेच सह आयुक्तांनी लेखी आदेश काढून मुंबईत वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि इतर पोलिस अधिकार्‍यांवरील खंडणीच्या गुन्हयांची आठवण करून दिली आहे.

 

सामाजिक सुरक्षा विभाग म्हणजेच एएचटीयु Anti-Human Trafficking Units (AHTU). मात्र संबंधित विभागात वेगळंच कामकाज सुरू असल्याचं आता वरिष्ठांना समजलंय. गेल्या काही महिन्यांपासून एकही ‘दमदार’ कामगिरी या विभागाकडून झालेली नाही. कोरोना काळात देखील स्पा सेंटर अन् शहरात सुरू असणार्‍या सेक्स रॅकेटवर छापे पडायचे. पण हल्ली लॉकडाऊन (Lockdown in Pune) पुर्णपणे ओपन झाल्यानंतर कारवाया थंडावल्याची चर्चा आहे.

दरम्यान, काही पोलिस अंमलदार ‘लोखंडा’चे घाव घालून मोठ्याप्रमाणावर कामकाज करत आहेत. ‘लोखंडा’च्या घावाचा ‘आवाज’ खूपच मोठा येत असल्याने ते अंमलदार कोणासाठी आणि कोणाचे कामकाज संभाळत आहेत याची चर्चा शहरभर होत आहे. मध्यंतरी कामकाजाचा खूपच मोठा ‘भपकारा’ उडल्यामुळे ‘भपकरे’ उडविणाऱ्याचे कामकाज ‘सुमडी’मध्ये सुरू आहे. मात्र, संबंधितांवर देखील अति वरिष्ठांची ‘नजर’ असल्याची चर्चा आहे.

 

शिवाजीनगर मुख्यालयातील ‘काळोखा’चा गुन्हे शाखेतील अधिकार्‍यांच्या कामकाजावर प्रकाश?

पुर्वी गुन्हेतील काही अधिकार्‍यांची ‘सेवा’ करणारे अनेकजण सध्या शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात (Shivaji Nagar Police Headquarter) कार्यरत आहेत.
गेल्या काही महिन्यापुर्वी गुन्हे शाखेत अनेक दिवसांपासुन रिक्त असणार्‍या पदावर अधिकार्‍यांची नियुक्ती झाली.
त्यानंतर सदैव या-ना ‘त्या’ मार्गानं कामकाज आपल्याकडं सलग रहावं यासाठी प्रयत्नीशल असणार्‍या
आणि त्यामध्ये ‘जय’ मिळवणार्‍या मुख्यालयातील (Shivaji Nagar HQ, Pune Police)
‘काळोखा’चा सध्या गुन्हे शाखेतील अधिकार्‍याच्या कामकाजावर लख्ख प्रकाश पडत असल्याची देखील माहिती संबंधितांना मिळाली आहे.
सुरू असलेलं कामकाज उजेडात येऊ नये म्हणून ‘काळोख’चं बरा असं धोरण संबंधित अधिकार्‍यांनी स्विकारल्याची चर्चा सध्या आहे.

 

कामकाजात अनेकजण ‘अ‍ॅक्टिव्ह’ तर काही अधिकार्‍यांनी ठेवलं ‘स्टॅन्डबाय’?

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी शहरात कोठेही अवैध धंदे सुरू राहणार नाहीत
याबाबत सर्व संबंधितांना वेळावेळी सांगितल्यानंतर तसेच काही कठोर कारवाई केल्यानंतर अनेक पोलिस अधिकार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.
काही पोलिस अंमलदार सद्यस्थितीत देखील ‘लपुन-छपून’ आपले उद्योग सुरू ठेवताहेत
तर काही अधिकार्‍यांनी कामकाज करणार्‍या ‘कलावंतां’ना ‘स्टॅन्डबाय’ राहण्याचा इशारा दिल्याची चर्चा सध्या पोलिस वर्तुळात आहे.
दरम्यान, सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या पुण्यात कार्यरत असलेल्या
काही अधिकार्‍यांनी संबंधित पोलिस ठाण्यालाच महिन्याकाठीचं टार्गेट दिलंय असं देखील बोललं जातंय.
गेल्या आठवडयात येरवडा (Yerwada Police Station), विमानतळ (Viman Nagar Police Station)
आणि विश्रांतवाडी पोलिस ठाण्याच्या (Vishrantwadi Police Station) हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे.

 

सध्याचं राज्यातील राजकारण अन् आगामी मनपा निवडणूकीमुळं फावतंय?

सध्याची राज्यातील राजकीय परिस्थिती (Political Situation In Maharashtra) आणि आगामी
पुणे महानगरपालिका Pune Corporation Elections (PMC Elections) निवडणुकीमुळे
अति वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांवर (Top Most Senior Police Officers) गेल्या
काही दिवसांपासुन खुपच कामाचा ताण (Work Load) आहे. त्यामुळे काही वजनदार अंमलदार हाच ‘मोसम’ योग्य आहे
म्हणून ‘कामकाज’ करण्यात मग्न आहेत. मात्र, सह आयुक्तांनी लेखी आदेश काढून झाडाझडती घेतल्यानंतर
काही पोलिस अधिकारी तसेच अंमलदारांची भंबेरी उडाली आहे.
आस्थापना अवैधरित्या चालु ठेवण्यासाठी प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष अवैध धंदेवाल्यांशी संबंध
ठेवणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं यापुर्वीच आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.
एवढेच नव्हे तर काही जणांवर निलंबनाची कारवाई देखील केली आहे.
त्यामुळे सर्वच ‘अ‍ॅक्टीव्ह’ मेंबरवर ‘वॉच’ असणार असल्याचं स्पष्ट झालंय.

 

स्पा अन् मसाज सेंटरचं शहरात पेव फुटलंय?

शहरात बहुतांश ठिकाणी स्पा अन् मसाज सेंटरचं (Spa Centres In Pune) पेव फुटलंय.
अशा परिस्थितील संबंधित अधिकार्‍यांचे ‘अ‍ॅक्टिव्ह’ अंमलदार त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर ‘मलिदा’ गोळा करत आहेत.
कोरोना ‘पीक’वर असताना देखील पोलिसांकडून ‘स्पा अन् मसाज सेंटर’वर (Massage Centers In Pune)
मोठ्या प्रमाणावर कारवाई (Action On Spa Centers In Pune) केली जात होती.
अलिकडील काही महिन्यांपासुन अ‍ॅक्टिव्ह अंमलदार क्रिकेटमधील ‘सचिन’ सारख्या धावा काढण्यात
‘मशगुल’ झाल्यानं कारवाया थंडावल्या आहेत काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
इतर अनेक अवैध आस्थापना देखील राजरोसपणे सुरू असल्याची चर्चा सध्या ऐकावयास मिळत आहे.

 

Web Title :- Pune Crime | Pune Crime Branch police officers are accepting money in the form of Protection Money to run illegal businesses in Pune; Top Most Senior Police Officers give this order, know more

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा