Pune Crime | पुणे गुन्हे शाखेकडून जुगार अड्ड्यावर छापा, 8 जणांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (Social Security Cell) विमानतळ पोलीस ठाण्याच्या (Viman Nagar Police Station) हद्दीत सुरु असलेल्या कल्याण मटका (Kalyan Matka) जुगार अड्ड्यावर (Gambling Den) छापा टाकला. ही कारवाई लोहगाव धानोरी जकात नाका येथे करण्यात आली. याप्रकरणी 8 आरोपींवर महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियमांतर्गत (Maharashtra Gambling Prohibition Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात (Pune Crime) आला आहे.

 

शंकर नरसिंग शावणे (वय – 42 रा. लोहगाव), बबन बन्सी सरोदे (वय – 51 रा. विश्रांतवाडी), धनंजय बापुराव गुट्टे (वय – 35 रा. धानोरी), सुरज माणिकराव मुळे (वय – 36 रा. लोहगाव), अमित सुखदेव शेलार (वय – 25 रा. विश्रांतवाडी), सनी राम तामचेकर (वय – 27 रा. येरवडा), संदिप अरुण भागवत (वय – 42 रा. धानोरी), बबलू बालू राठोड (वय – 27 रा. येरवडा) अशी गुन्हा दाखल केलल्या आरोपींची नावे आहेत. (Pune Crime)

 

लोहगाव धानोरी जकात नाक्याजवळ (Lohgaon Dhanori Jakat Naka) बेकायदेशीर जुगार खेळत व खेळवित असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मिळालेल्या माहितीची खात्री करुन छापा टाकला. पोलिसांनी 8 जणांकडून चार हजार रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त केले. आरोपींवर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge) यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक (Senior Police Inspector Rajesh Puranic), पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर (PSI Supriya Pandharkar), पोलीस अंमलदार बाबा कर्पे, मनिषा पुकाळे, अश्विनी केकाण, हणमंत कांबळे यांच्या पथकाने केली.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | Pune Crime Branch raids gambling den FIR against 8 persons viman nagar police station limits

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा