Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! कचरा वेचणाऱ्या तिघांवर उकळतं पाणी ओतलं; दोघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील सासवड (Saswad) ठिकाणी माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना (Pune Crime) समोर आली आहे. कचरा वेचणाऱ्या तिघांवर एका हॉटेल चालकाने उकळते पाणी ओतल्याने यात दोघांचा मृत्यू (Died) झाला आहे. तसेच एकाची प्रकृती चिंताजनक आहे. हॉटेल चालकानं उकळतं पाणी ओतल्याने तिघे गंभीररीत्या भाजले गेलेत. यात दोघांचा मृत्यू झाल्याने पुणे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

ही घटना 23 मे रोजी दुपारी घडली. आता याची माहिती समोर आली आहे. कचरा वेचणारी एक वृद्ध महिला या घटनेबाबत माहिती देत असल्याचा एक व्हिडीओ समोर आलाय. या वृद्ध महिलेचाही आता मृत्यू झाला आहे. शेवंताबाई (Shevantabai) (वय,60) असं त्या वृद्ध महिलेचं नाव आहे. या घटनेचे काही व्हिडीओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले आहेत. (Pune Crime)

 

मृत्यू झालेल्या संबधित इसमाला ठिकठिकाणी गंभीर जखमा झाल्याचं आणि भाजल्याचं व्हिडीओमध्ये दिसलं आहे. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. हॉटेल चालकानं रस्त्यावर कचरा वेचणाऱ्या तिघांवर उकळतं पाणी फेकल्याचा आरोप केला जात आहे. निलेश उर्फ पप्पू जगपात (Nilesh / Pappu Jagpat) असं त्या हॉटेलचालकाचं नाव असून हा हॉटेलचालक सध्या फरार आहे. या घटनेप्रकरणी कचरा वेचणाऱ्यांवर उकळते पाणी फेकणाऱ्या हॉटेल चालकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, पोलीस स्टेशनपासून काही हाकेच्या अंतरावर ही घटना घडली आहे.
खोटे पोस्टमॉर्टम रिपोर्ट बनवून हे प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पोलिसांना याप्रकरणी दबाव असल्याचा आरोप
शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे (Shivsena Leader Vijay Shivtare) यांनी केला आहे.
याप्रकरणी चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

 

Web Title :- Pune Crime | pune crime hotel owner thrown warm water on three garbage people two died one seriously injured

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा