×
Homeक्राईम स्टोरीPune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार अजय विटकर व त्याच्या टोळीवर 'मोक्का',...

Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार अजय विटकर व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 98 वी कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा (MCOCA Action) Mokka बडगा कायम ठेवत आतापर्यंत 98 टोळ्याविरुद्ध कारवाई केली आहे. पुण्यातील (Pune Crime) चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chatushringi Police Station) हद्दीत दहशत पसरवणारा सराईत गुन्हेगार अजय चंद्रकांत विटकर व त्याच्या टोळीतील 7 जणांवर पुणे पोलीस (Pune Police) आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. आयुक्तांनी आजपर्यंत 98 आणि चालु वर्षात 35 टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे.

टोळी प्रमुख अजय चंद्रकांत विटकर Ajay Chandrakant Witkar (वय-20 रा. वडारवाडी, पुणे), विजय चंद्रकांत विटकर (वय-18), दत्ता रविंद्र धोत्रे (वय-22), सागर मनोहर धोत्रे (वय-27), सिद्धार्थ शंकर गायकवाड (वय-23 सर्व रा. वडारवाडी), कृष्णा उर्फ किची राजेश माने (वय-25रा. सेनापती बापट रोड, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. तर अतुल धोत्रे (वय-22), विजय उर्फ चपाती विटकर (वय-23) हे फरार असून त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे.

अजय विटकर व त्याच्या साथीदारांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्वत:चे तसेच टोळीचे वर्चस्व व्हावे व अवैध मार्गाने इतर फायदा व्हावा यासाठी गंभीर गुन्हे केले आहेत. खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), जबरी चोरी (Theft), मारामारी, गंभीर दुखापत, जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill), बेकायदा शस्त्र बाळगणे, वाहनांची तोडफोड करुन नुकसान करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या टोळीविरुद्ध यापूर्वी प्रतिबंधक कारवाई (Preventive Action) करण्यात आली होती. मात्र त्यांच्यामध्ये काहीच सुधारणा झाली नाही.(Pune Crime)

अजय विटकर टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे (Senior Police Inspector Rajkumar Waghachavare) यांनी परिमंडळ 4 पोलीस उपायुक्त रोहिदास पवार (DCP Rohidas Pawar) यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan) यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाला अपर पोलीस आयुक्तांनी मंजूरी दिल्याने आरोपींविरुद्ध मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास खडकी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे (ACP Arti Bansode) करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(Jt CP Joint Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण,
पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 रोहीदास पवार, सहायक पोलीस आरती बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे, पोलीस निरीक्षक गुन्हे अंकुश चिंतामण
(Police Inspector Ankush Chintaman), सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे
(API Rajkumar Kendra), यांच्यासह सर्व्हेलन्स पथकाचे पोलीस उपनिरीक्षक निलेश महाडिक
(PSI Nilesh Mahadik), पोलीस अंमलदार अमित छडीदार, अमित गद्रे यांच्या पथकाने केली.

आयुक्तांची 98 वी मोक्का कारवाई

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत.
शरिराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या व लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 98 तर चालु वर्षात 35 गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

Web Title :- Pune Crime | Pune Police Commissioner Amitabh Gupta’s 98th MCOCA action on criminals till date, Ajay Witkar and his gang also booked under mokka

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vitamin D Supplements घेत असाल तर जाणून घ्या ‘या’ महत्वाच्या गोष्टी, अन्यथा होऊ शकते नुकसान

MNS On Shinde-Fadnavis Government | मनसेची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका, पालकमंत्र्यांची निवड आणि शिंदे गटातील घराणेशाहीवर भाष्य

 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News