Pune Crime | हॉटेल व्यावसायिकाला 2 लाखांची खंडणी मागणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | स्नॅक सेंटरसाठी खर्च केलेले २ लाख रुपये दे, असे म्हणून हॉटेल व्यावसायिकाला बालावून धमकावून २ लाख रुपयांची खंडणी मागणार्‍या तरुणाला गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने अटक (Pune Crime) केली आहे.

 

करण केविन डिवाझ (वय २३, रा़ कोंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी निखील भगत (वय ४०, रा. सनश्री सोसायटी, कोंढवा) यांनी कोंढवा पोलिसांकडे (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे.
भगत यांचे मिसाळ दरबार नावाचे हॉटेल असून त्यांनी त्यामध्ये मिली डिवाझ यांना स्नॅक सेंटर चालवियला दिले होते.
मात्र, त्यांच्यात वाद झाल्याने भगत यांनी त्यांना एक महिन्यात सेंटर खाली करायला सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी सेंटर खाली केले.
त्यांचा मुलगा करण हा या सेंटरसाठी खर्च केलेले २ लाख रुपये परत मागू लागला. त्याला भगत यांनी नकार दिला होता.
त्यानंतर करण याने एका महिलेस फ्लॅट पाहिजे आहे, असे भासवून त्यांना रहेजा व्हिस्टा चौक येथे बोलावले.
ते तेथे गेलेल्या असताना करण व इतर तिघांना जीवे मारण्याची धमकी देऊन २ लाख रुपये परत मागितले होते.

याबाबत खंडणीचा गुन्हा (extortion case) दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेचे युनिट २ चे पथकातील पोलीस हवालदार मोहसीन शेख यांना माहिती मिळाली की,
खंडणी मागणारा करण डिवाझ हा एन आय बी एम रोडवर थांबला आहे.
त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश मोरे, सहायक फौजदार यशवंत आंब्रे, अस्लमखान पठाण, हवालदार मोहसीन शेख,
पोलीस शिपाई समीर पटेल यांनी घटनास्थळी जाऊन करण डिवाझ याला ताब्यात घेतले.
अधिक तपासासाठी त्याला कोंढवा पोलीस ठाण्याच्या हवाली (Pune Crime) करण्यात आले आहे.

 

Web Title : Pune Crime | pune police Crime Branch arrests hotelier for demanding Rs 2 lakh ransom

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Eyesight growth Tips | दृष्टी मजबूत करणारे ‘हे’ आहेत 4 उपाय, जाणून घ्या जबरदस्त फायदे

PM Kisan | शेतकर्‍यांसाठी महत्वाची बातमी ! पीएम किसानच्या 10 व्या हप्त्यासाठी ‘हे’ कार्ड आवश्यक, अन्यथा अकाऊंटमध्ये येणार नाहीत पैसे

Climate Change | जलवायू परिवर्तनामुळे भारतातील ‘या’ शहरांना धोका ! पुढील 9 वर्षात पाण्याखाली बुडण्याची शक्यता, महाराष्ट्रातील 2 शहरांचाही समावेश