Pune Crime | पुर्ववैमनस्यातून तरुणाचे शीर धडावेगळे करणाऱ्या त्रिकुटाला पुणे ग्रामीण पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुर्ववैमनस्यातून तरुणाचे धडावेगळे शीर कापून क्रूर पद्धतीने खून (Murder) करणाऱ्या त्रिकुटाला पुणे ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अटक केले आहे. ही घटना 12 ऑक्टोबरला वेल्हा तालुक्यात आंबेगावमध्ये (Pune Crime) घडली होती.

 

संजय बाबुराव कडू देशमुख Sanjay Baburao Kadu Deshmukh (वय ३६, रा. कुराण, वेल्हा),  धनंजय सदानंद ढमाले Dhananjay Sadanand Dhamale (वय ३२, रा. नवी पेठ, ता.वेल्हा) आणि गणेश दत्तात्रय निवंगुणे Ganesh Dattatray Niwangune (वय ४०, रा. आंबी, ता.वेल्हा) अशी अटक (Arrest) केलेल्यांची नावे आहेत. राहुल प्रकाश रावत Rahul Prakash Rawat (वय-२८, रा. भोसरी) असे खून केलेल्याचे नाव आहे. (Pune Crime)

 

वेल्हेतील कदावे-शिरकोली रस्त्यालगत धडापासून शिर वेगळे केलेला कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून (एलसीबी)  करण्यात येत होता. आरोपींनी  तरुणाचा खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचे शीर धडावेगळे करुन डावा हात तोडलेला होता. तांत्रिक विश्लेषणासह खबऱ्याच्या माहितीनुसार आरोपींची माहिती पोलिस नाईक अमोल शेडगे (Amol Shedge) यांना मिळाली.  त्यानुसार एलसीबी पथकाने हवेली तालुक्यातील सोमेश्वरवाडीमधून तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी पुर्ववैमनस्यातून राहूलचा खून केल्याची कबुली दिली.

 

पैशाचे आमिष दाखवून आरोपींनी राहूलला भोसरीतून दांडेकर पुल (Dandekar Bridge) परिसरात बोलवून घेतले. त्यानंतर  गणेश निवंगुणे याच्या पोल्ट्री फार्मवर नेऊन राहूलवर वार करुन खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचे धडावेगळे शीर करून मोटारीतून मृतदेह  आंबेगाव परिसरात टाकण्यात आला. कोणताही पुरावा नसताना पुणे ग्रामीण पोलीसांनी कौशल्याने तपास करून आरोपींना अटक केली.

Advt.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (SP Dr. Abhinav Deshmukh),
अपर पोलीस अधीक्षक मीतेश घट्टे (Addl SP Meetesh Ghatte),
उपविभागीय अधिकारी भाउसाहेब ढोले पाटील (Sub Divisional Officer Bhausaheb Dhole Patil),
पोलीस निरीक्षक अशोक शेळके (Police Inspector Ashok Shelke),
सहायक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे (API Netaji Gandhare),
हनुमंत पासलकर,  राजू मोमीन, दत्तात्रय तांबे, अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, समाधान नाईकनवरे यांनी केली.

 

Web Title :- Pune Crime | Pune rural police arrested the trio who beheaded
a young man due to past enmity

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा