Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! पर्स, चप्पल चोरीचा आळ घेतल्याने 17 वर्षाच्या तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या, घरमालक महिलेवर गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पर्स व चप्पल चोरीचा आळ घेतल्याने तो सहन न झाल्याने एका 17 वर्षाच्या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police Station) घरमालक असलेल्या महिलेवर गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

 

पायल बाबु चव्हाण Payal Babu Chavan (वय १७, रा. कृष्णानगर, मोहमंदवाडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी तिच्या आईने कोंढवा (Kondhwa) पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी उंड्री (undri pune) येथील एका ४० वर्षाच्या महिलेवर आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मोहमंदवाडी येथे शुक्रवारी उघडकीस आली.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पायल ही उंड्री येथील आरोपी महिलेच्या घरी गेल्या काही महिन्यांपासून घरकाम करीत होती. या महिलेने तिच्यावर पर्स व चप्पल चोरीचा आळ घेतला होता. त्यावरुन घरमालकिण हिने पायल हिला सातत्याने त्रास दिला होता. चोरीचा हा आरोप सहन न झाल्याने तिने शुक्रवारी राहते घरी गळफास (Suicide in Pune) घेऊन आत्महत्या केली. कोंढवा पोलिसांनी गुन्हा (Pune Crime) दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक दगडे अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Shocking incident in Pune! 17-year-old girl commits suicide by stealing purse, slippers

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

ATM Withdrawal Charges Rules | आजपासून ATM मधून पैसे काढण्यासाठी लागणार जास्त चार्ज ! बँक लॉकर आणि PF शी संबंधित नियमही बदलले; जाणून घ्या

Multibagger Stock | ‘या’ स्टॉकने अवघ्या 9 महिन्यात गुंतवणुकदारांना बनवलं करोडपती, तुमच्याकडे आहे का हा स्टॉक?

IPS Ankita Sharma | ही आयपीएस महिला प्रसिध्दीच्या झोतात… हातामध्ये AK-47 घेऊन नक्षलवाद्यांच्या विरूध्द करते ऑपरेशन