Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार शुभम ऊफाळे एक वर्षासाठी स्थानबद्ध ! MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 68 जणांवर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरातील (Pune Crime) सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या (Sinhagad Road Police Station) हद्दीत दहशत पसरवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यानुसार (MPDA Act) एक वर्षासाठी स्थानबद्धतेची (Pune Crime) कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी आजपर्यंत तब्बल 68 जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

 

सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अट्टल गुन्हेगार शुभम सचिन ऊफाळे Shubham Sachin Ufale (वय – 21 रा. हिंगने खुर्द, साई नगर, पुणे) असे स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे (Pune Criminals) नाव आहे. शुभम ऊफाळे याला एमपीडीए कायद्यान्वये औरंगाबाद कारागृहात (Aurangabad Jail) एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्यात आले आहे. (Pune Crime)

 

शुभम ऊफाळे हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार (Criminals On Pune Police Record) असून त्याने त्याच्या साथीदारांसह सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोयता, चाकु, लोखंडी रॉड या सारख्या हत्यारांसह फिरत असताना खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), दुखापत, दंगा (Riots), दरोड्याचा प्रयत्न (Attempted Robbery), बेकायदा हत्यार (Weapon) बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे (FIR) केले आहेत. मागील पाच वर्षामध्ये त्याच्याविरुद्ध 03 गुन्हे दाखल आहेत.

प्राप्त झालेला प्रस्ताव आणि कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शुभम ऊफाळे याच्यावर एमपीडीए अ‍ॅक्ट अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश दिले.
सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युसूफ शेख (Senior Police Inspector Yusuf Sheikh),
पी. सी. बी. गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे (Senior Police Inspector Vaishali Chandgude) यांनी ही कामगिरी केली.

 

पोलीस आयुक्तांनी पुणे शहरात दहशत निर्माण करणाऱ्या व सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई (Preventative Action) करण्याचे धोरण अवलंबिले आहे.
आजपर्यंत 68 गुन्हेगारांना एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध केले आहे.
यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | Shubham Uphale a notorious criminal from Pune is lodged for one year Under MPDA CP Amitabh Guptas action against 68 people under MPDA Act

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा