Pune Crime | येरवडा कारागृहात कैद्याची आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील (Pune News) येरवडा खुल्या कारागृहात (Yerwada Jail) जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide In Jail) केल्याची धक्कादायक घटना (Pune Crime) घडली आहे. ही घटना गुरूवारी दुपारी घडली. गणेश जगन्नाथ तांबे (Ganesh Jagannath Tambe) (वय, 53) असं आत्महत्या केलेल्या कैद्याचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांकडून (Yerwada Police) आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, येरवडा खुल्या कारागृहातील जन्मठेपेची शिक्षा भोगत असणाऱ्या गणेश तांबे या कैद्याने दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती कारागृह प्रशासनाच्यावतीने येरवडा पोलिसांना देण्यात आली होती. दरम्यान गणेश तांबे हा विरार पोलिस स्टेशन (Virar Police Station) येथील 2010 मध्ये केलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी होता. (Pune Crime)

 

गणेश तांबे याने स्वयंपाकाचे काम उरकल्यानंतर बराक क्रमांक दोन येथे त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे इतर कैद्यांनी बघितले.
या घटनेनंतर खुल्या कारागृहाचे प्रभारी अधीक्षक जी. ए. मानकर (G. A. Mankar) यांनी तात्काळ याबाबत माहिती कारागृह विभागाचे वैद्यकीय अधिकारी यांना दिली.
वैद्यकीय तपासणीपूर्वी त्याचा मृत्यू (Died) झाल्याचे घोषित करण्यात आले.

दरम्यान, याबाबत माहिती समजताच येरवडा कारागृहाच्या अधिक्षक राणी भोसले (SP Rani Bhosale), वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख (Senior PI Yunus Sheikh), सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर करपे (API Sameer Karpe) यांनी घटनास्थळी धाव घेतली.
त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात रवाना करण्यात आला असून पुढील तपास येरवडा पोलिस (Yerawada Police) करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | suicide by strangulation of a prisoner serving life sentence in yerawada jail

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा