Pune Crime Suicide News | भाजप नेत्याच्या सॉफ्टवेअर इंजिनिअर मुलीची पुण्यात आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime Suicide News | गडचिरोली येथील भारतीय जनता पक्षाचे नेते वासुदेव बट्टे आणि माजी नगरसेविका वर्षा वासुदेव बट्टे यांची मुलगी सॉफ्टवेअर इंजिनिअर सायली वासुदेव बट्टे (24, सध्या रा. बावधन, मुळ रा. झाशीनगर, चंद्रपूर रस्ता, गडचिरोली) हिने पुण्यातील बावधन परिसरात गळफास घेऊन आत्महत्या (BJP Leader Daughter Suicide In Bavdhan Pune) केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. (Pune Crime Suicide News)

याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या वर्षभरापासून सायली ही पुण्यातील एका आयटी कंपनीमध्ये (Pune IT Companies) कामाला होती. कामाच्या ताणामुळे ती नैराश्यात होती. याच तणावातून तिने शनिवारी (दि.18) रात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

काही दिवस सायली ही तिच्या भावासोबत राहत होती. तिचा भाऊ काही दिवसांपुर्वीच गडचिरोली येथे परतला होता.
त्यामुळे सायली ही तिच्या रूमवर एकटीच होती. शनिवारी तिने तिच्या कुटुंबियांना कॉल केला. सर्वांशी ती बोलली.
मात्र, त्यानंतर तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात (Hinjewadi Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title : Pune Crime Suicide News | BJP leader’s software engineer daughter commits suicide in Bavdhan Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Popatrao Gawade | राष्ट्रवादीचे माजी आमदार, शरद पवारांचे निकटवर्तीय पोपटराव गावडे रूबी हॉलमध्ये दाखल, उपचार सुरू

Salman Khan | अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर त्याच्या सुरक्षितेत वाढ