Pune Crime | येरवडा कारागृह परिसरात गस्त घालणाऱ्या पोलिसांना धक्काबुक्की

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | येरवडा कारागृह (Yerwada Jail) परिसरात गस्त (Petroling) घालणाऱ्या पोलिसांना (Pune Police) शिवीगाळ करुन मारहाण (Beating) केल्याप्रकरणी येरवडा कारागृहातील रक्षकासह त्याची पत्नी आणि मुलाच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. महादेव प्रभू म्हस्के (Mahadev Prabhu Mhaske) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांची पत्नी आणि मुलाच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणणे तसेच धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस शिपाई दयानंद शिवाजी कदम (Police constable Dayanand Shivaji Kadam) (३०) यांनी फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

पोलीस शिपाई दयानंद कदम आणि सहकारी सकट हे ९ ऑक्टोबरला कारागृह परिसरात गस्त घालत होते. त्यवेळी कारागृह परिसरातील प्रेस कॅन्टीनजवळ अंधारात म्हस्के, त्यांची पत्नी आणि मुलगा थांबला होता. पोलिसांनी त्यांना हटकले आणि घरी जाण्यास सांगितले.
त्यानंतर म्हस्के यांची पत्नी आणि मुलाने पोलीस शिपाई कदम आणि सकट यांना शिवीगाळ केली.
म्हस्के यांच्या पत्नीने कदम यांना धक्काबुक्की केली.
येरवडा पोलिसांकडून (Yerwada Police) या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

 

Web Title :- Pune Crime | The police patrolling the Yerwada Jail premises were shocked

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा