Pune Crime | पुण्याच्या कोरोना लसीकरण केंद्रामधील डाटा एन्ट्रीच्या कॉम्प्युटरची चोरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन कोरोना विरोधी लस उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्र बंद (covid vaccination center) असल्याचा फायदा चोरट्यांनी घेतला आहे. पुण्यातील (Pune Crime) लसीकरण केंद्राचे दरवाजा उचकटून चोरट्यांनी चोरी (Theft) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार पुण्यातील (Pune Crime) कर्वेनगरमधील (Karve Nagar) शाहु कॉलनीमधील नियोजन शाळा येथे 23 व 24 ऑगस्ट दरम्यान घडला आहे.

याप्रकरणी समर्थ सुभाष पवार Samarth Pawar (वय-20 रा. अष्टविनायक चौक, वारजे माळवाडी) यांनी वारजे पोलीस ठाण्यात (Warje police station) फिर्याद दिली आहे.
पवार यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समर्थ पवार हे महापालिकेच्या आरोग्य विभागात (Municipal Health Department) मनपा शाळेतील कोव्हिड लसीकरण केंद्रात नोकरी करतात.
सध्या कोविडची लस उपलब्ध नसल्याने हे लसीकरण केंद्र बंद आहे.
लसीकरण केंद्रासाठी महापालिकेने एक संगणक दिला असून तो शाळेतील जिन्याच्या बाजूला असलेल्या खोलीत ठेवला होता.
लसीकरण केंद्र बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून आतमध्ये प्रवेश केला.
चोरट्यांनी 50 हजार रुपयांचा कॉम्प्युटर (computer) आणि 1 हजार रुपये किमतीचा कडी कोयड्याचा बॉक्स असा एकूण 51 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.
पुढील तपास वारजे पोलीस करीत आहेत.

 

Web Title : pune crime | theft covid vaccination center pune computer disappeared

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Driving License | ‘या’ अँपद्वारे ‘DL’ करू शकता फोनमध्ये डाऊनलोड; जाणून घ्या

Pune Crime | पुण्यातील महिलेला वडापावची ‘तलफ’ पडली महागात, चोरट्यांचा पर्समधील 8 लाखाच्या दागिन्यावर ‘डल्ला’

Unlimited Data | 3 महिन्यांपर्यंत रोज मिळवा 5 GB सह अनलिमिटेड डेटा, जाणून घ्या कोणत्या कंपनीचा सर्वात स्वस्त प्लान