Pune Crime | सावकाराच्या जाचाला कंटाळून व्यावसायिक गेला घर सोडून; सावकारावर FIR

पुणे : Pune Crime | अडचणीच्या वेळी व्यवसायाकरीता व्याजाने पैसे घेतले असताना त्याच्या दुप्पटीहून अधिक रक्कम परत केली. तरीही आणखी पैशांची मागणी करुन जीवे मारण्याची धमकी (Threats to kill) दिली. त्यामुळे व्यावसायिक घरातून निघून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पराग गायकवाड Parag Gaikwad (वय 40, रा. लक्ष्मीनगर, पर्वती) याच्याविरुद्ध खंडणी (Extortion) तसेच सावकारी अधिनियमानुसार (Moneylending Act) गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी आंबेगाव येथे राहणार्‍या एका 27 वर्षाच्या महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. 677/22) दिली आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती अमोल ईचगे (Amol Eichage) यांनी पराग गायकवाड याच्याकडून व्यवसायासाठी 12 ते 15 टक्के व्याजाने अंदाज 8 लाख रुपये फेब्रुवारी 2017 मध्ये घेतले होते. त्यांनी ठरल्याप्रमाणे प्रत्येक महिन्याला मिळून आतापर्यंत 19 लाख रुपये परत केली.
असे असतानाही गायकवाड याने आणखी 15 लाख रुपयांची मागणी केली.
गायकवाड याने फिर्यादीचे आई वडिल व पतीस जीवे मारण्याची धमकी दिली. ‘‘तुम्ही दोघांनी मला खूप त्रास दिलेला आहे. तुमच्याकडून मला माझे व्याजाचे ९ लाख रुपये इतकी रक्कम येणे बाकी आहे. परंतु, तुम्ही मला वेळेवर रक्कम दिली नाही, त्यामुळे तुम्हाला आता मला १५ लाख रुपये द्यावे लागतील. रक्कम दिली नाही तर मी तुम्हाला जीवंत सोडणार नाही,’’ अशी धमकी दिली. त्याच्या धमकीमुळे अमोल ईचगे हे घाबरुन ८ ऑक्टोबरला घरातून निघून गेले आहे. पोलीस उपनिरीक्षक गुप्ता (Sub-Inspector of Police Gupta) अधिक तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Tired of the lender’s scrutiny, the businessman left home; FIR against moneylender crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा