Pune Crime | उधारीचे पैसे मागितल्याने व्यावसायिकावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; येरवडा परिसरातील घटना

पुणे : Pune Crime | उधारीचे पैसे मागितल्याने एका टोळक्याने व्यावसायिकावर कोयत्याने वार करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण (Beating) करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Kill) केला. याप्रकरणी पोलिसांनी राहुल पिसे ऊर्फ टर्प्या Rahul Pise Terpya (वय २०, रा. लक्ष्मीनगर, येरवडा – Yerwada) याला अटक (Arrest) केली आहे. त्याच्या दोघा अल्पवयीन साथीदारांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

याबाबत मुकीम शकील अहमंद Mukeem Shakeel Ahmad (वय २८, रा. येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४५५/२२) दिली आहे. हा प्रकार येरवडा येथील क्षीरसागर हॉलजवळ बुधवारी रात्री सात वाजता घडला. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे गरम मसालाची हातगाडी लावून विक्री करीत असतात.
क्षीरसागर हॉल येथे ते हातगाडी घेऊन थांबले होते. त्यावेळी राहुल पिसे व त्याचे दोन साथीदार आले.
फिर्यादी याने राहुल याच्याकडे उधारीचे पैसे मागितले.
तेव्हा त्याने शिवीगाळ करुन त्यांच्यावर कोयत्याने कपाळावर वार करुन जबर जखमी केले.
त्याच्याबरोबरच्या साथीदारांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
तेव्हा काही लोक भांडणे सोडविण्यास आले असताना राहुल पिसे याने ‘‘कोई हमारे बीच मे आया तो एक एक को काट डालुंगा, किसी को छोडुंगा नही, मै जेल काट के आया हू’’ अशी धमकी देऊन दहशत निर्माण केली.
पोलिसांनी राहुल पिसे याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक खटके (Assistant Police Inspector Khatke) तपास करीत आहे.

Web Title :- Pune Crime | Trying to kill a businessman by stabbing him for asking for borrowed money

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune News | गणेशखिंड रस्त्यावरील पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे काम 6 ऑक्टोबरपासून सुरू; चांदणी चौकातील उड्डाणपुल 2 ऑक्टोबरला पाडणार, 2 ऑक्टोबरला मुंबई- बंगळूर महामार्गावर ‘मेगाब्लॉक’