Pune Crime | उरूळी कांचनमधून बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह आढळला दौंड तालुक्यात, महिला 8 दिवसांपासून बेपत्ता होती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मागील आठ दिवसांपासून उरुळी कांचन (Uruli Kanchan) येथून बेपत्ता (Missing) झालेल्या महिलेचा मृतदेह (Dead Body) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. बेपत्ता महिलेचा मृतदेह शनिवारी दौंड तालुक्यातील (Daud Taluka) दहीटने येथील मुळा मुठा नदी पात्रात मिळून आला आहे. त्यामुळे या महिलेने आत्महत्या (Suicide) केली की तिचा घातपात झाला हे (Pune Crime) समजू शकले नाही.

 

सुनिता विलास चौधरी Sunita Vilas Choudhary (वय – 34 रा. तुळशीराम नगर, उरुळी कांचन) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचे वडील अर्जुन धोंडीबा बचुटे Arjun Dhondiba Bachute (वय – 73 रा. आनंदनगर, ता. कल्याण, जि. ठाणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) सुनिता बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. (Pune Crime)

 

मिळालेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या हद्दीतील तुळशीराम नगर परिसरात सुनिता या पतीपासून वेगळ्या राहत होत्या.
त्या रविवारी (दि.10) घरातून कोणाला काही न सांगता निघून गेल्या होत्या.
कुटुंबीय, नातेवाईकांनी शोध घेऊनही न सापडल्याने त्या बेपत्ता झाल्याची तक्रार वडील अर्जुन बचुटे यांनी लोणी काळभोर पोलिसांकडे केली.
शनिवारी सुनिता यांचा मृतदेह हा दहीटने ग्रामपंचायत हद्दीतील मुळा मुठा नदीच्या पात्रात मिळून आला आहे.
पुढील तपास यवत पोलीस ठाण्यातील (Yawat Police Station) अधिकारी करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | uruli kanchan missing woman body found in daund lived separately from her husband

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा