Pune Crime | काल्याच्या जेवणातून 45 जणांना विषबाधा, काही जणांची प्रकृती चिंताजनक; पुण्याच्या मावळ तालुक्यातील घटना

पुणे / मावळ : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) मावळ तालुक्यातील भडवली (Bhadwali taluka Maval) येथे 35 ते 45 लोकांना अन्नातून विषबाधा (Pune Crime) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आले आहे. गुरुवारी (दि.18) एका कार्यक्रमाच्या वेळी लोकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर ही विषबाधा (Food Poisoning in Pune) झाल्याचे समोर आले आहे. भडवली गावात काकडा आरती समाप्तीचा काल्याचा सार्वजनिक कार्यक्रम झाला होता. यानंतर देण्यात आलेल्या जेवणातून विषबाधा झाली.

 

मिळालेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील पवन मावळ परिसरातील भडवली गावात हा प्रकार घडला आहे. बाधित रुग्णांना ग्रामीण रुग्णालयात (rural hospital) तातडीने उपचारासाठी दाखल (Pune Crime) करण्यात आले. यामध्ये काही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. तर काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. यामध्ये 6 ते 7 लहान मुलांचा समावेश आहे.

 

 

रुग्णालयातील तीनही वॉर्ड फुल झाल्याने काही रुग्णांना ग्रामीण रुग्णालय कान्हेफाटा येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
तर काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना विविध ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
वैद्यकीय अधिक्षक डॉ. इंद्रनिल पाटील (Medical Superintendent Dr. Indranil Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली
डॉ. वर्षा पाटील (Dr. Varsha Patil), डॉ. विश्वंभर सोनवणे (Dr. Vishvambhar Sonawane), डॉ. पोपट आधाते,
डॉ. शिवराज वाघमारे रुग्णांवर उपचार करीत आहेत.
या ठिकाणी लोणावळा ग्रामीणचे पोलीस (Lonavla Rural Police) व
वडगाव मावळ पोलीस (Wadgaon Maval Police) अधिकारी उपस्थित होते.

 

Web Title :- Pune Crime | wadgaon maval taluka pune poisoned food condition some critical pune rural lonavala rural police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा