Pune Crime | परदेशात नोकरीच्या अमिषाने फसवणूक करणाऱ्या महिलेला 16 वर्षांनी अटक

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  परदेशात नोकरी लावण्याचे अमिष दाखवून अनेकांना गंडा घालणाऱ्या महिलेला पुणे (Pune Crime) पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. गुन्हा घडल्यापासून ही महिला 16 वर्षे फरार होती. राहत तालीबअली सैय्यद उर्फ अलका भगवानदास शर्मा (वय-54 रा. आनंदयोग सोसायटी, विमाननगर, मुळ रा. जागीरपुरी, दिल्ली) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. महिलेने पुण्यातील (Pune Crime) अनेकांची फसवणूक (Cheating) केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

परदेशात नोकरी लावण्याच्या आमिषाने फसवणूक केल्याचा गुन्हा 2005 मध्ये खडक पोलीस ठाण्यात (khadak police station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता.
अबिदअली मसुदअली सैय्यद, अब्दुलवहाब महमंदहनीफ मुजावर, राहत सैय्यद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याबाबत ज्ञानेश्वर जमदाडे यांनी फिर्याद दिली होती.
परदेशात नोकरीच्या आमिषाने जमदाडे, त्यांचे मित्र सुरेश रक्ती, प्रज्ञावंत करमरकर यांच्यासह अनेकांची फसवणूक करण्यात आली होती.

 

गुन्हा दाखल झाल्यानंतर राहत सय्यद ही महिला नाव बदलून विमाननगर परिसरात
(Vimannagar area) राहत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकचे
पोलीस नाईक अमोल पवार (Amol Pawar) यांना मिळाली.
त्यानंतर पोलिसांनी तिच्यावर पाळत ठेऊन तिला ताब्यात घेतले.
तिच्याकडे कसून चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली.

ही कारवाई गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्त अशोक मोराळे (additional superintendent of police ashok morale), उपायुक्त श्रीनिवास घाडगे (deputy commissioner of police shreeniwas ghadge), सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख (Assistant Commissioner of Police Surendranath Deshmukh) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलेश संखे (Police Inspector Shailesh Sankhe), उपनिरीक्षक संजय गायकवाड (Police Sub Inspector Sanjay Gaikwad), सुनील कुलकर्णी (Police Sub Inspector Sanil Kulkarni), अजय थोरात, अमोल पवार, इम्रान शेख, तुषार माळवदकर, मीना पिंजण, रूखसाना नदाफ यांच्या पथकाने केली.

 

Web Title : Pune Crime | Woman arrested after 16 years for cheating on job abroad

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gold Price Today | सोन्याचे दर पुन्हा घसरले, चांदी 372 रुपयांनी झाली ‘स्वस्त’, खरेदीपूर्वी पहा नवीन भाव

Post-Covid Hair Fall | कोविड रिकव्हरीनंतर केस गळत आहेत का, मग करा हे 5 उपाय

PM Kisan | खुशखबर! 12.11 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात येणार आहेत 2000 रुपये, चेक करा कधी येणार पैसे?