Pune Crime | सराफी दुकानातून 2 कोटी 60 लाखांचे 5 किलो सोन्याची बिस्किटे चोरुन नेणारी महिला गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | सराफी दुकानातून सोने (Gold) खरेदी करुन गाडीत ठेवलेले पैसे घेऊन येते असे सांगून २ कोटी ६० लाख रुपयांचे ५ किलो सोन्याचे बिस्किटे (Golden Biscuits) घेऊन पळून गेलेल्या महिलेला फरासखाना पोलिसांनी (Faraskhana Police) खारघर (Kharghar) येथून अटक (Arrest) केली आहे. माधवी सूरज चव्हाण Madhavi Suraj Chavan (वय ३२, रा. खारघर) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी राकेश सोलंकी (Rakesh Solanki) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १२३/२२) दिली आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधवी चव्हाण या पोपटलाल गोल्ड (Popatlal Gold) येथून नेहमी सोने घेऊन जात असल्याने त्या ओळखीच्या होत्या. पुण्यातून सोने घेऊन जाऊन त्या अधिक किंमतीने खारघरला विकत असे.

 

माधवी बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास रविवार पेठेतील (Raviwar Peth, Pune) पोपटलाल गोल्डच्या दुकानात आल्या. त्या नेहमी किलो, अर्धा किलो अशा वजनाचे सोने खरेदी करत असत. बुधवारी त्यांनी आपण गर्भवती असल्याने वारंवार येण्यास जमणार नाही, असे सांगून तब्बल २ कोटी ६० लाख रुपयांचे ५ किलो सोन्याची बिस्किटे खरेदी केली. काही रक्कम रोख व काही आर टी जीएस करणार असल्याचे सांगितले. सोन्याची बिस्किटे गाडीत ठेवून पैसे घेऊन येते, असे सांगून त्या दुकानातून बाहेर पडल्या. फिर्यादी यांनी एक कर्मचारी त्यांच्याबरोबर दिला. (Pune Crime)

मात्र, त्या कर्मचाऱ्यांना हुलकावणी देऊन पळून गेल्या. त्यानंतर तिने मोबाईलही बंद केला.
त्यामुळे संशय आल्याने सोलंकी यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली.
पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणावरुन तिचा माग काढला. तेव्हा ती खारघर येथे पोहचली असल्याचे आढळून आले.
तातडीने एक पथक खारघर येथे गेले. त्याने माधवी चव्हाण हिला अटक केली.
पोलीस उपनिरीक्षक शिंदे (Sub-Inspector of Police Shinde) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Woman who stole 5 kg gold biscuits worth 2.6 million from Sarafi shop in Gajaad

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा