Pune Crime | दिवाळीच्या स्टॉलसाठी फिडरमधुन वीज घेण्याचा प्रयत्न करताना तरुणाचा मृत्यू

पुणे : Pune Crime | दिवाळीचा स्टॉल लावताना त्यासाठी अनधिकृतपणे हायटेंशन वीज पुरवठा केला जाणार्‍या फिडर पिलरमधून (Feeder Pillar) वीज घेण्याचा प्रयत्न करताना एका तरुणाचा वीजेचा धक्का (Electric Shock) बसून मृत्यू झाला. (Pune Crime)

प्रविण अशोक माने Pravin Ashok Mane (वय ३८, रा. गणेशखिंड रोड, औंध) असे मृत्यु पावलेल्याचे नाव आहे.

याप्रकरणी सहायक अभियंता मनोज प्रभाकर नेमाडे (Assistant Engineer Manoj Prabhakar Nemade) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४५९/२२) दिली आहे. त्यानुसार प्रविण माने आणि शांताबाई पांडुरंग खंदारे Shantabai Pandurang Khandare (वय ३२) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार औंध येथील स्टार बक्स कॉफी शॉपचे समोरील आय टी आय रोडशेजारील फुटपाथवर ११ के व्ही फिडर पिलरमध्ये १९ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता घडला. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांताबाई खंदारे यांचे दिवाळी स्टॉल फुटपाथवर आहे.
तेथे जवळच घरगुती वीजपुरवठा करणारे लो टेंशन फिडर व ११ के व्ही फिडर पिलर शेजारी शेजारी आहे. प्रविण माने यांनी हाय टेन्शन फिडर पिलरचा दरवाजा अनधिकृतपणे उघडून विद्युत वाहिनीमधून वीज चोरी करण्याच्या उद्देशाने विद्युत वाहिनीला छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना जोरात वीजेचा धक्का बसून ते जखमी झाले. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यु झाला. सहायक पोलीस निरीक्षक झरेकर (Assistant Police Inspector Zarekar) तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Youth dies while trying to get electricity from feeder for Diwali stall

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ST Fare Hike | एसटीची दिवाळी हंगामी भाडेवाढ आज मध्यरात्रीपासून लागू, प्रवाशांच्या खिशावर 5 ते 75 रुपयांचा भार

Maharashtra IPS Officer Transfer | महाराष्ट्र पोलीस दलातील 5 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या