Pune Cyber Crime | परदेशातील कुरिअरमध्ये अमली पदार्थ सापडल्याची बतावणी, बाणेरमधील डॉक्टरची एक कोटीची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Cyber Crime | परदेशातून आलेल्या करिअरमध्ये अमली पदार्थ सापडल्याची बतावणी पोलीस कारवाईची भीती दाखवून लुटण्याचे प्रकार वाढत आहेत. बाणेर भागातील एका डॉक्टरची सायबर चोरट्यांनी एक कोटी एक लाख 30 हजार रुपयांची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत एका डॉक्टरांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर गुन्हेगारांविरुद्ध (Cyber Thieves ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Pune Cyber ​​Crime)

फिर्यादी डॉक्टरांच्या मोबाईल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संपर्क साधला. तुमच्या नावाने परदेशातून कुरिअर कंपनीने पाकीट पाठवले आहे. मुंबई विमानतळावर पाकीट जप्त केले आहे. पाकिटामध्ये पाच पारपत्र, अमली पदार्थ, परदेशी चलन, लॅपटॉप सापडला आहे. मुंबई गुन्हे शाखेतील अधिकारी बोलत असून, त्वरीत चौकशीसाठी गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर रहावे लागेल, अशी बतावणी चोरट्यांनी केली.(Pune Cyber ​​Crime)

चोरट्यांनी त्यांच्या समाजमाध्यमातील खात्यावर मुंबई पोलिसांचे बोधचिन्ह वापरले होते.
तुमच्या बँक खात्याची पडताळणी करायची असून, तातडीने खासगी बँकेतील रोकड सरकारी बँकेत जमा करावी लागेल,
असे चोरट्यांनी सांगितले. तक्रारदाराच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेऊन सायबर गुन्हेगारांनी एक कोटी एक लाख
30 हजार रुपये चोरले. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल माने (PI Anil Mane) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Parvati Crime | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपी गजाआड

Kangana Ranaut-Mandi Lok Sabha | कंगना रनौतला भाजपकडून उमेदवारी जाहीर, सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली…

Mahavikas Aghadi-Shivsena | आज मविआची निर्णायक बैठक, उद्या शिवसेना उमेदवारांची पहिली यादी येणार, जाणून घ्या संभाव्य नावे

Maval Lok Sabha | महायुतीत ‘ऑल इज नॉट वेल’! मावळमध्ये सुद्धा शिंदे गट आणि राष्ट्रवादीत वादावादी, तटकरेंना कडेलोटाचा इशारा