Pune Dahi Handi | श्रद्धाताई गोरक्ष (आप्पा) परांडे जनहित मंच आयोजित भव्य महिला दहिहंडी उत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Dahi Handi | गोविंदा रे गोपाळा, गो गो गोविंदा सह थिराकायला लावणाऱ्या मराठी – हिंदी गाण्यांच्या तालावर तरुणाईच्या  जल्लोषात श्रद्धाताई गोरक्ष (आप्पा) परांडे जनहित मंच आयोजित भव्य महिला दहिहंडी उत्सव सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.मंगळवार पेठेतील नवज्योत ग्रुप च्या गोविंदांनी मानवी मनोऱ्याचे पाच थर लावत ही दहीहंडी फोडली. (Pune Dahi Handi)

 धनकवडीतील आंबेगाव पठार येथे श्रद्धाताई गोरक्ष (आप्पा)परांडे जनहित मंच आयोजित भव्य महिला दहिहंडी उत्सवला प्रमुख पाहुणे आमदार भीमराव आण्णा तापकीर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशालभाऊ तांबे , माजी नगरसेवक राजेंद्र आबा शिळीमकर,महेशभाऊ वाबळे, स्मिताताई कोंढरे,भाऊ महाराज परांडे, युवराजभाऊ बेलदरे, तुषार नांदे, प्रविण दुगड, किर्तीराज दुगड, गौरव दुगड, मोनल दुगड, आयोजक श्रद्धाताई आप्पा परांडे, गोरक्ष परांडे,हनुमंत परांडे आदि मान्यवर उपस्थित होते.या भव्य सोहळ्यात सुप्रसिद्ध मराठी कलाकारांनी आपल्या उपस्थितीने रंग भरले यामध्ये अभिनेत्री जुई गडकरी, अभिनेता निखिल राऊत, आरुष प्रसाद बेडेकर (योग योगेश्वर जयशंकर मालिकेतील बालशंकर) , इंद्रनील कामत आणि रसिका वाखारकर (प्रीतीचा वणवा उरी पेटला) यांचा समावेश होता. (Pune Dahi Handi)

तसेच या दहीहंडी उत्सवानिमित्त धनकवडी-आंबेगाव पठार भागातील विविध खेळात
आपली कर्तबगारी दाखवुन आपल्या धनकवडीचे व देशाचे नाव उंचविणारे स्मिता घुगे, सुप्रिया सुपेकर, धनराज शिर्के, विष्णु चिद्रेवार, साहिल स्पोर्ट्स क्लब या सर्वांना “धनकवडी रत्न पुरस्कार” देऊन गौरवण्यात आले.

पुणे शहरातील या सर्वात मोठ्या दहीहंडी उत्सवाला धनकवडी – आंबेगाव पठार परिसरातील दहा हजारांहून
अधिक नागरीक उपस्थित होते यामध्ये तरुणी व महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Radhakrishna Vikhe Patil | धनगर आरक्षणावरुन राधाकृष्ण विखे पाटलांवर टाकला भंडारा, प्रतिक्रिया देताना विखे पाटील म्हणाले… (व्हिडिओ)

हिंजवडी आयटी पार्कमध्ये मेफेड्रॉन, अफू विकणारे दोन राजस्थानी गजाआड, गुन्हे शाखेची कारवाई

Wagle Ki Duniya | सोनी सबवरील वागले की दुनिया मालिकेतील परिवा प्रणती ऊर्फ वंदना म्हणाली,
भय आणि लोकलज्जेला मागे टाकून ब्रेस्ट कॅन्सरवर खुलेपणाने चर्चा करणे महत्त्वाचे आहे

Pashmina – The Thread Of Love | सोनी सबवरील पश्मिना मालिकेत निशांत मलकानी साकारणार व्यवहारचतुर दिग्गज उद्योगपती राघवची भूमिका