Radhakrishna Vikhe Patil | धनगर आरक्षणावरुन राधाकृष्ण विखे पाटलांवर टाकला भंडारा, प्रतिक्रिया देताना विखे पाटील म्हणाले… (व्हिडिओ)

संतप्त कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही काळं लावण्याचा इशारा

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Radhakrishna Vikhe Patil | राज्यामध्ये सध्या आरक्षणचा मुद्दा तापला आहे. मराठा समाजाचे आरक्षण (Maratha Reservation) तसेच त्यांना हवे असलेले कुणबी प्रमाणपत्र यामुळे आऱक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यामध्ये आता धनगर समाजाच्या आरक्षणामुळे (Dhangar Reservation) राजकारण तापण्याची शक्यता आहे. सोलापूरमध्ये राज्याचे महसूल मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यावर भंडारा टाकण्यात आला आहे. बंगाळे नामक धनगर आरक्षण कृती समितीच्या (Dhangar Reservation Action Committee) पदाधिकाऱ्याने हा भंडारा टाकला असून य़ामुळे पुन्हा एकदा धनगर आरक्षणावरुन राजकारण रंगण्याची शक्यता आहे.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी धनगर आरक्षण कृती समितीचे पदाधिकारी हे त्यांना आरक्षणाचे निवेदन देण्यासाठी आले होते. त्यांची भेट घेत विखे पाटील समितीचे निवेदन वाचत होते. दरम्यान बंगाळे नामक पदाधिकाऱ्याने खिशातून एक पुडी काढून त्यातला भंडारा विखे पाटलांच्या डोक्यावर टाकला. अचानक हा प्रकार घडल्यामुळे सर्वच अवाक झाले. विखे पाटलांच्या सुरक्षा रक्षकांनी व कार्यकर्त्यांनी बंगाळे नामक व्यक्तीला मागे घेत त्याला मारहाण केली. या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सर्व प्रकार घडल्यानंतर विखे पाटलांनी देखील त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

महसूल मंत्री विखे पाटील यांच्यावर भंडारा फेकणाऱ्या बंगाळे नामक व्यक्तीने धनगर समाजासाठी आऱक्षणाची मागणी केली आहे. “धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने घटनादत्त एसटी आरक्षणाची अंमलबजावणी त्वरीत करावी व ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) कोणत्याही प्रकारे धक्का लावू नये यासाठी आम्ही निवेदन दिलं आहे. मी प्रसारमाध्यमातून आवाहन करतो की धनगर आरक्षणाची अंमलबजावणी लवकरात लवकर झाली नाही, तर येणाऱ्या काळात मुख्यमंत्री, मंत्र्यांना काळं फासायलाही धनगर समाज मागे-पुढे बघणार नाही.” असा धमकी वजा इशारा बंगाळे यांनी दिला आहे.

घडलेल्या प्रकारानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अचानक सर्व प्रकार घडल्यामुळे कार्यकर्त्यांनी केलेली मारहाण स्वाभाविक असल्याचे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांचे समर्थन केले आहे. घडलेल्या प्रकाराबद्दल प्रतिक्रिया देताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की, “भंडारा हा नेहमीच पवित्र मानला जातो. पवित्र भंडाऱ्याची उधळण माझ्यावर झाली याचा मला विशेष आनंद आहे. प्रतिकात्मक भावना व्यक्त करण्याची भूमिका असते. त्यात त्यांनी काही वावगं केलंय असं मला वाटत नाही. त्यानं अचाकन ती कृती केल्यामुळे सुरक्षा रक्षकांनी विरोध करत प्रतिसाद दिला. त्यांची ती जबाबदारीच आहे. तरी मी सूचना दिल्या आहेत की गुन्हा वगैरे दाखल करू नका. कोणतीही कारवाई करू नका” असे विखे पाटील म्हणाले आहेत.

पुढे राधाकृष्ण विखे पाटलांना विचारण्यात आले की, तिथे सुरक्षारक्षक असूनही कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीला मारहाण का केली? यावर ते म्हणाले की, “ती कोणत्याही कार्यकर्त्याची स्वाभाविक प्रतिक्रिया असते. त्यामुळे कार्यकर्त्यांना त्या क्षणी तसं वाटल्यामुळे त्यांनी ती कृती केली. मी कार्यकर्त्यांना सांगेनच.
पण घटनाच अशी होती की कार्यकर्त्यांकडून स्वाभाविक प्रतिक्रिया येणं साहजिक होतं. अचानक घडलेल्या प्रकारामुळे सगळे गोंधळून गेले होते.
त्यामुळे तिथे झटापट झाली. त्यामुळे कोणत्या समाजाचा कार्यकर्ता म्हणून त्याला
मारहाण करण्याची भूमिका मुळीच नव्हती” असे मत विखे पाटीलांनी व्यक्त केले आहे.
आरक्षणाच्या मुद्द्यांमधील राजकीय हस्तक्षेपामुळे त्याचं गांभीर्य संपत चाललं आहे.
समाजाच्या भावना म्हणून आपण त्याचा आदर करतो. पण त्यांच्यामागून काही राजकीय मंडळी गैरफायदा घेत आहेत.
आंदोलन बदनाम करण्याचा ही मंडळी प्रयत्न करत आहेत.
ते दुर्दैवी असल्याचे देखील राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) म्हणाले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | सांभाळ करणार्‍या मुलीच्या नावावर हिस्स्याचे बक्षीसपत्र केल्याने मुलाने केले बनावट हक्क सोडपत्र;
आईने आपल्याच मुलावर केला गुन्हा दाखल