
Pune Crime News | हिंजवडी आयटी पार्कमध्ये मेफेड्रॉन, अफू विकणारे दोन राजस्थानी गजाआड, गुन्हे शाखेची कारवाई
पुणे / पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | राजस्थानमधून तस्करी करुन आणलेल्या अंमली पदार्थाची हिंजवडी आयटी पार्कमध्ये (Hinjewadi IT Park) विक्री करताना पोलिसांना दोघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 1 किलो 705 ग्रॅम अफुचा चुरा (पॉपी स्ट्रॉ/डुडा) व 61 ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी) असा एकूण 3 लाख 39 हजार 575 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या (Pimpri Chinchwad Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली. (Pune Crime News)
सुरेशकुमार साईराम बिष्णोई (वय-30 रा. वडकीनाला, हडपसर, मुळ रा. हेमंतनगर, ता. लोहावट, जि. फलोदी राजस्थान), रविप्रकाश सुखराम बिष्णोई (वय-37 रा. बावधन खुर्द, मुळ रा. सदरी ता. लोहावट, जि. फलोदी, राजस्थान) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर त्यांना अमली पदार्थ देणारा राजस्थानमधील साथीदार सोनू जालोरा आणि हिंजवडीतील साथीदार जयप्रकाश बिष्णोई यांच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)
हिंजवडी आयटी पार्क येथे काम करणारे तरुण, तरुणी कामाच्या ताणामुळे व्यसनांच्या विळख्यात सापडू नयेत, यासाठी जनजागृती तसेच अंमली पदार्थांच्या विक्रीचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिले आहेत.
अमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग
करत होते. मुंबई-बंगळुरु महामार्गावर बावधन येथे आरोपी अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार
असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला असता आरोपी
कोणाची तरी वाट पहात थांबले होते. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची
अंगझडती घेतली असता अंमली पदार्थ सापडले.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा