Pune Dahi Handi – Traffic Updates | पुण्यात दहिहंडी उत्सावानिमित्त वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात दहिहंडी उत्सव (Pune Dahi Handi – Traffic Updates) मोठ्या प्रमाणात साजार होत आहे. दहीहंडी उत्सवासाठी (Pune Dahi Handi – Traffic Updates) मोठ्या प्रमाणात नागरिक शहरात येत असल्याने पुणे वाहतूक पोलिसांच्या (Pune Traffic Police) वतीने खबरदारी घेतली जात आहे. दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने गुरुवारी (दि.7) सायंकाळी पाच पासून शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीत बदल करण्यात (Traffic Changes) आला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर (DCP Vijayakumar Magar) यांनी केले आहे.

शहरातील मध्यवर्ती भागातील छत्रपती शिवाजी महाराज, लक्ष्मी रस्ता (Lakshmi Road), बाजीराव रस्ता (Bajirao Road), टिळक रस्ता (Tilak Road) या रस्त्यांवर दरवर्षीप्रमाणे यंदा विविध दहीहंडी उत्सव मंडळांकडून दहीहंडी (Pune Dahi Handi) साजरी केली जाणार आहे. त्यामुळे सायंकाळी पाच वाजल्यापासून दहीहंडी फुटेपर्यंत मजूर अड्डा चौक (बुधवार चौक) ते दत्तमंदिर चौक, बेलबाग चौक ते सेवासदन चौक, मजूर अड्डा चौक ते अप्पा बळवंत चौक, महात्मा फुले मंडई, महाराष्ट्र साहित्य परिषद, नवी पेठ या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यावेळी या मार्गावर कुठेही वाहतूक कोंडी होऊ नये व वाहनचालकांची गैरसोय होऊन नये यासाठी या रस्त्यावरील वाहतुकीमध्ये सायंकाळी पाच वाजल्यापासून बदल करण्यात आले आहेत. (Pune Dahi Handi – Traffic Updates)

वाहन चालकांनी या पर्यायी मार्गाचा वापर करावा

  1. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरून स्वारगेटला (Swargate) जाणार्‍या वाहनांनी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने (Jangli Maharaj Road) खंडोजीबाबा चौक, टिळक चौक, टिळक रस्ता किंवा लाल बहादूर शास्त्री रस्त्याने इच्छित स्थळी जावे.
  2. पूरम चौकातून बाजीराव रस्त्याने शिवाजीनगर (Shivajinagar) कडे जाणार्‍या वाहनचालकांनी पूरम चौकातून टिळक रस्ता, अलका टॉकीज चौक (Alka Talkies Chowk), फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्याने (FC Road) पुढे जावे. तसेच पुरम चौकातुन सेनादत्त चौकाकडे व पुढे इच्छित स्थळी जावे.
  3. स. गो. बर्वे चौकातून छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याने महापालिकेकडे (PMC) जाणार्‍या वाहनांनी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने झाशी राणी चौकातून डावीकडे वळून इच्छितस्थळी जावे.
  4. बुधवार चौकाकडून आप्पा बळवंत चौकाकडे (Appa Balwant Chowk) एकेरी वाहतुक सोडण्यात येणार आहे.

    आप्पा बळवंत चौकातुन बुधवार चौकाकडे येणारी वाहतुक बाजीराव रोडने सरळ पुढे इच्छित स्थळी जातील.
  5. रामेश्वर चौक ते शनिपार चौकाकडे येणारी वाहतुक बंद करण्यात आली आहे. पर्यायी मार्गाचा वापर करावा.
  6. सोन्या मारुती चौकाकडून लक्ष्मी रस्त्याने सरळ सेवासदन चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.
    वाहनचालकांनी सोन्या मारुती चौकातून उजवीकडे वळुन फडके हौद चौकातून इच्छित स्थळी जावे.
  7. शिवाजी रोडवरुन जिजामाता चौकातून गणेश रोडने दारुवाला पुलाकडे जाणारी वाहतूक हि गाडगीळ पुतळा येथून
    डाव्या बाजूने कुंभारवेस चौक-पवळे चौक-जुनी साततोटी पोलीस चौकी मार्गाने इच्छित स्थळी जातील
  8. गणेश रोडवरील संपूर्ण वाहतूक ही दारुवाला पुल येथून बंद करण्यात येणार आहे. तसेच देवजीबाब चौक व फडके हौद
    चौकात वाहतूक बंद करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी अपोलो टॉकीज, नरपतगिरी चौक, दारूवाला पूल,
    दुधभट्टी या मार्गाचा वापर करावा.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation Protest | मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास ओबीसी संघटनांचा विरोध; राज्य सरकारला दिला इशारा