Pune Deccan Traffic Parking Updates | डेक्कन वाहतूक विभागाअंतर्गत पार्किंग व्यवस्थेत बदल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Deccan Traffic Parking Updates | डेक्कन वाहतुक विभागांतर्गत कर्वे रोडवरील पार्किंगसंदर्भात यापूर्वी काढलेल्या तात्पुरत्या आदेशांवर नागरिकांच्या सूचना विचारात घेऊन पार्किंग व्यवस्थेत बदल करण्याबाबत अंतिम आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. (Changes in parking arrangement under Deccan Traffic Division)

त्यानुसार रसशाळा चौकाकडून स्वातंत्र्य चौकाकडे जाताना बँक ऑफ महाराष्ट्रसमोर १० मीटर, भाग्यश्री ज्वेलर्स ते चैतन्य नगरी सोसायटी १५ मीटर, युनियन बँक ते स्वप्न नगरी सोसायटी २० मीटर चारचाकी पार्किंग करण्यात आले आहे. तर सिद्धेश्वर मेडीकल ते कोहिनूर वॉईन्सपर्यंत १५ मीटर आणि गणेश चेंबर, रेबन शोरुम ते अमर हार्डवेअर पर्यंत १५ मीटर दुचाकी पार्किंग करण्यात आले आहे. (Pune Deccan Traffic Parking Updates)

स्वातंत्र्य चौक ते रसशाळा चौकाकडे जाताना कल्याण ज्वेलर्सशेजारील धनश्री ग्लास दुकान ते गो- कलर्स दुकानपर्यंत
५ मीटर दुचाकी पार्किंग करण्यात आले आहे. जगन्नाथ तरटे मार्गाशेजारील ओपन हाऊस, सारथी हॉटेल ते प्राईम फर्निचर
शोरुम पर्यंत २५ मीटर दुचाकी व २५ मीटर चारचाकी पार्किंग करण्यात आले आहे. भोडे कॉलनी लेन ते कचरे पथ १० मीटर
दुचाकी व १० मीटर चारचाकी पार्किंग करण्यात आले आहे, असे पुणे शहर वाहतुक विभागाचे
पोलीस उपआयुक्त विजयकुमार मगर (DCP Vijaykumar Magar) यांनी कळविले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police MCOCA Action | खुनाचा प्रयत्न करणाऱ्या अमन पठाण व त्याच्या इतर 2 साथीदारांवर ‘मोक्का’! पोलिस आयुक्तांकडून आतापर्यंत 49 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA