Pune Dhankawadi Crime | पुणे : घराचे बनावट कुलमुखत्यारपत्र तयार केल्याचे प्रकरण; माजी पत्रकारासह तिघांना पोलीस कोठडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Dhankawadi Crime | भाडे कराराने घेतलेल्या जागेचे बनावट कुलमुखत्यारपत्र तयार करुन घर नावावर करुन घेत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लहुजी आर्मी नावाने संघटना चालवणाऱ्या एका माजी पत्रकाराने हा उपद्व्याप केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी (Sahakarnagar Police Station) चार जणांवर गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली आहे. हा प्रकार मे 2022 ते 4 एप्रिल 2024 या कालावधीत धनकवडी मधील हत्ती चौकातील चाळ नंबर सी/6/14 येथे घडला आहे. आरोपींना न्यायालयात (Pune Court) हजर केले असता सर्व आरोपींना 11 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (Pune Dhankawadi Crime)

याबाबत तानाजी नामदेव पांगरे (वय-76 रा. चाळ नंबर सी/6/14, हत्ती चौक, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन अंबादास सूर्यवंशी Ambadas Suryavanshi, नरसिंह सुर्यवंशी Narasimha Suryavanshi (दोघे रा. मार्केट यार्ड रोड, आंबेडकर नगर), प्रभाकर इंगळे Prabhakar Ingle (रा. गोखलेनगर, लाल चाळ, पुणे) यांना अटक केली आहे. तर मुकेश जाधव Mukesh Jadhav (रा. आंबेडकर नगर) याच्यावर आयपीसी 420, 465, 467, 468, 471, 182, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.यातील अंबादास हा माजी पत्रकार असून काही वर्षांपासून लहुजी आर्मी (Lahuji Army) नावाने एक संघटना चालवीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे (Senior PI Surendra Malale) यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तानाजी पांगारे यांचे चाळ नंबर सी/6/14 मध्ये घर आहे. या ठिकाणी असलेला एक गाळा त्यांनी भाड्याने द्यायचे ठरवले होते. अंबादास सूर्यवंशी याने मे 2022 मध्ये हा गाळा त्यांच्याकडून भाडे करारावर घेतला. त्याचा 11 महिन्यांचा करारनामा करण्यात आला. त्यानंतर काही दिवसांनी अंबादास सूर्यवंशी याने एका बॉण्डवर बनावट कुलमुखत्यार पत्र भाऊ नरसिंह याच्या नावाने तयार करुन घेतले. त्यावर फिर्यादीच्या खोट्या सह्या करण्यात आल्या आणि हा गाळा त्यांच्याकडून कुलमुखत्यार पत्राद्वारे घेतल्याचे भासवण्यात आले. आरोपींनी बनवलेल्या बनावट कुलमुखत्यारपत्रावर प्रभाकर इंगळे आणि मुकेश जाधव यांनी साक्षीदार म्हणून सह्या केल्या. त्यावर फिर्यादीचा फोटो लावून त्यांच्या खोट्या सह्या व अंगठे उठवलेले होते. कॅश व्हाऊचरद्वारे वीस लाख रुपये रोखीने दिल्याची खोटी माहिती नमूद करण्यात आली होती.

आरोपींनी संगणमत करून तयार केलेल्या बनावट कुलमुखत्यार पत्राचा वापर करून आरोपींनी पांगारे यांना या ठिकाणी सुरू असलेला फॅब्रिकेशनचा कारखाना बंद करून कामगारांना बाहेर काढा अशी मागणी केली. दरम्यान पांगारे यांनी आपण कोणत्याही प्रकारचा दस्त करून दिला नसल्याची भूमिका घेतली. त्यानंतर मागील आठवड्यात सूर्यवंशी याने काही कार्यकर्त्यांना घेऊन त्याच्या संघटनेमार्फत सहकारनगर पोलीस ठाण्याच्या समोर घोषणाबाजी करीत आंदोलन केले.
त्यावेळी सहकार नगर पोलिसांनी कलम 135 नुसार गुन्हा दाखल करून कारवाई केली होती.
दरम्यान, फिर्यादी पांगारे यांनी आपण कोणत्याही प्रकारचे कुलमुखत्यार पत्र तयार करून दिले नसल्याचे आणि
पैसे घेतले नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी पोलिसांकडे याबाबत सखोल तपास करण्याची देखील विनंती केली.

दरम्यान हा जागेचा वाद असल्याने पोलिसांनी वरिष्ठांच्या परवानगीने कलम 185 नुसार कारवाई करीत सर्व कागदपत्रांची पडताळणी केली.
त्यावेळी हे कुलमुखत्यार पत्र नोंदणीकृत नसून केवळ नोटराईज केलेले असल्याचे लक्षात आले.
या पडताळणीमध्ये बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आला असून फिर्यादीच्या बनावट सह्या आणि अंगठा करण्यात उठवण्यात आल्याचे देखील समोर आले.
त्यानुसार सहकारनगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली.
आरोपींना न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे उत्तम भजनावळे (PI Uttam Bhajanwale) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे : तरुणीचा फोटो वापरुन इंन्स्टाग्रामवर तयार केले फेक अकाउंट, मॉर्फ फोटो व्हायरल करुन विनयभंग

Devendra Fadnavis In Indapur | इंदापुरातील कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन, म्हणाले ”कृतीतून करून दाखवणार हा…”