Pune Doctor Attack Case | ‘डॉक्टर प्रोटेक्शन कायद्याची अंमलबजावणी करा;’ डॉक्टरांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ कोंढव्यात रॅली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोंढवा येथील सना हॉस्पिटलमधील ऑन ड्यूटी डॉक्टरांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या (Pune Doctor Attack Case) निषेधार्थ रॅली काढण्यात आली. हडपसर डॉक्टर असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला ज्योती चौकातून सुरुवात (Pune Doctor Attack Case) करण्यात आली होती.

सना हॉस्पिटलमधील डॉक्टरांवर झालेल्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये येरवडा डॉक्टर असोसिएशन, कोंढवा व्यापारी असोसिएशन, पुणे शहरातील सर्व मेडिकल (Pune Doctor Attack Case) असोसिएशनसह सर्व राजकीय पक्षांचे स्थानिक नेते आणि पदधिकारी सहभागी झाले होते.

डॉक्टर कधीही वेळ काळ न पाहता प्रामाणिकपणे रुग्णांवर उपचार करत असतात.
डॉक्टरांना पूर्वीपासूनच देवदूत म्हणून स्थान दिले आहे, कारण डॉक्टर आपल्या आयुष्यात कित्येक रुग्णांचे प्राण वाचवत असतो.
असे असताना समाजातील काही घटक वारंवार डॉक्टरांवर हल्ले करत आहेत.
ही अत्यंत अशोभनीय बाब असून, याचा आम्ही तीव्र निषेध करतो, असे सना हॉस्पीटलचे डॉ. सोहेल यांनी सांगितले.

याशिवाय डॉक्टरांवर होणारे हल्ले थांबवण्यासाठी डॉक्टर प्रोटेक्शन कायद्याची कडक अंमलबजावणी करावी.
तसेच संबंधितांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा,
याबाबचे निवेदन कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोंगळे यांना देण्यात आले.

Chennai Super Kings (CSK) | धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्सचा उत्तराधिकारी कोण? सीएसकेच्या प्रशिक्षकांनी केला ‘हा’ मोठा खुलासा