Pune Drug Case | ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणात पुणे पोलिसांची मोठी कारवाई ! ‘ससून’मधील महेंद्र शेवते, येरवडा कारागृहातील पोलीस मोईस शेख व कॉन्सिलर सुधाकर इंगळे यांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Drug Case | ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात (Drug Mafia Lalit Patil) पुणे पोलिसांनी मोठी (Pune Police) कारवाई केली आहे. कारगृहातून (Yerwada Jail) ससून रुग्णालयात (Sassoon Hospital Drug Case) येणारे कैदी आणि त्यांचे नातेवाईक त्यांच्याशी संपर्क साधून सेटलमेंट करणारा ससून रुग्णालयातील कर्मचारी महेंद्र शेवते (Mahendra Shevte) याला पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Pune Police Crime Branch) सोमवारी (दि.27) अटक केली. यानंतर येरवडा कारागृहातील पोलीस शिपाई मोईस शेख Moise Shaikh (वय-30) आणि कारागृहातील कॉन्सिलर सुधाकर सखाराम इंगळे Consiler Sudhakar Sakharam Ingle (वय 44) यांना देखील अटक करण्यात आली आहे. (Pune Drug Case)

येरवडा कारागृहातील पोलीस शिपाई मोईस शेख याला ललित पाटील पलायन प्रकरणात बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या आयपीसी 223, 224, 225 गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात येरवडा कारागृहातील कॉन्सिलर सुधाकर इंगळे याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने मंगळवारी (दि.28) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्याला देखील अटक करण्यात आली आहे. (Pune Drug Case)

ललित पाटील पलायन प्रकरणात आजपर्य़ंत 11 आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेने अटक केलेल्या महेंद्र शेवते आणि मोईस शेख यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 1 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर मंगळवारी अटक केलेला कारागृहातील कॉन्सिलर सुधाकर इंगळे याला बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट-2 चे पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवाई करीत आहेत.

महेंद्र शेवतेला अटक

ससून रुग्णालयाचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांच्या अत्यंत जवळचा आणि कैद्यांशी सलोख्याचे संबंध ठेवणारा म्हणून महेंद्र शेवते याची ओळख होती. कैद्यांशी व त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून शेवते हा डॉक्टरांसोबत संधान साधून कैद्याचा ससून मधील मुक्काम कसा वाढविता येईल, हे पाहत होता. यासाठी तो कैद्यांकडून लाखो रुपये घेत असल्याचे समोर आले. ललित पाटील याचा ससून रुग्णालयातील मुक्काम वाढवण्यासाठी महेंद्र शेवते हा मध्यस्थी करत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पुणे पोलिसांनी त्याला अटक केली.

पोलीस शिपाई मोईस शेखने दिला मोबाईल

ललित पाटील हा कारागृहात बसून ड्रग्ज रॅकेट चालवत होता. त्या दरम्यान त्याला मोबाईल फोनची गरज भासली होती. त्याकाळात ललित पाटीलला अनेकांशी संपर्कात रहावे लागत होतं. याच काळात पोलीस शिपाई मोईस शेख ललित पाटीलच्या संपर्कात आला. त्याने ललित पाटीलला स्वत:चा फोन देऊन बाहेर ललितचा भाऊ भूषण पाटील याच्याची बोलणं करुन दिलं होतं. ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील हा नाशिकमध्ये मेफेड्रॉनचा कारखाना चालवत होता. मोईस शेख याच्या फोनचा वापर करुन ललित पाटील भावाशी बोलत होता आणि दोघे मिळून हे रॅकेट चालवत होते. ललित पाटील प्रकरणात पुणे पोलिसांकडून अनेकांची चौकशी करण्यात येत आहे. यात मोईस शेख याची चौकशी केली असता त्याने ललित पाटील याला मोबाईल पुरवल्याचे निष्पन्न झाले.

ललित पाटील प्रकरणावरुन राजकीय गदारोळ

पिंपरी चिंचवड पोलिसांनी ऑक्टोबर 2020 मध्ये ललित पाटील याला अटक करुन कोट्यावधी रुपयांचे एमडी जप्त केले होते.
ललित पाटील याला अटक झाल्यानंतर त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली.
जून महिन्यात त्याला टीबी आणि हार्नियाच्या उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
2 ऑक्टोबर रोजी संधी साधून ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेला. क्ष-किरणासाठी नेत असताना तो पळून गेला.
यानंतर मुंबई पोलिसांच्या पथकाने त्याला परराज्यातून अटक केली. ललित पाटील पलायन प्रकरणावरुन मोठा
राजकीय गदारोळ झाला. या घटनेवरुन शिवसेना (उठाबा) नेत्या सुषमा अंधारे, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि इतर
नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला होता.

पुणे पोलिसांविरोधात धंगेकरांचा आंदोलनाचा इशारा

ललित पाटील प्रकरणात आमदार रविंद्र धंगेकर यांनी पहिल्यापासून ससून रुग्णालय प्रशासनाच्या कामजाबाबत अनेक
प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच ललित पाटील प्रकरणात ससुन रुग्णालयाचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांच्यावर
कारवाई करण्याची देखील त्यांनी सतत मागणी केली आहे. परंतु, प्रत्यक्षात अशी कोणतीही कारवाई होत नसल्याने
पुणे पोलिसांच्या विरोधात धंगेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
यासाठी त्यांनी आता थेट पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

2 पोलीस बडतर्फ

ड्रग्ज माफिया ललित पाटील याला ससून हॉस्पिटलमधून पळून जाण्यास मदत करणाऱ्या तसेच तो पळून गेल्याचा
बनाव करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. पोलीस नाईक नाथाराम भरत काळे आणि
पोलिस शिपाई अमित सुरेश जाधव अशी बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
अपर पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी हे आदेश काढले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Crime News | धक्कादायक! शिक्षकाने पत्नी, छोट्या मुलाची केली हत्या, स्वत: घेतला गळफास

Pune Crime News | लोणीकंद : वाघोली परिसरातील बकोरी रोड येथे समलैंगिक संबंधातून बीबीएच्या शेवटच्या वर्षात वर्षात शिकणार्‍या 21 वर्षीय तरूणाचा खून