Maharashtra Crime News | धक्कादायक! शिक्षकाने पत्नी, छोट्या मुलाची केली हत्या, स्वत: घेतला गळफास

सोलापूर : Maharashtra Crime News | जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेल्या एका शिक्षकाने आपल्या शिक्षक पत्नीची गळा कापून हत्या केली. तसेच पाच वर्षांच्या मुलाच्या तोंडावर उशी दाबून त्यालाही ठार केले. यानंतर त्याने स्वता गळफास घेऊन आत्महत्या केली. ही भयंकर घटना सोलापूरमधील बार्शी तालुक्यातील उपळाई रोडवरील नाईकवाडी प्लॉट येथे घडली आहे. हत्या आणि आत्महत्येचा हा धक्कादायक प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर संपूर्ण बार्शी तालुका हादरला. (Maharashtra Crime News)

घटनेची माहिती पोलिसांना कळविल्यानंतर बार्शी शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा आणि इतर प्रक्रिया सुरू केली. मृतांचे नावे अतुल सुमंत मुंढे (४०), तृप्ती अतुल मुंढे (३५) ओम सुमंत मुंढे (५) अशी आहेत. (Maharashtra Crime News)

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहिती नुसार, करमाळा तालुक्यात जिल्हा परिषद शाळेत अतुल मुंढे हे शिक्षक म्हणून कार्यरत होते. तर त्यांच्या पत्नी तृप्ती मुंढे या अभिनव प्राथमिक शाळा, बार्शी येथे शिक्षिका म्हणून काम करत होत्या. मुंढे कुटुंबियांचे उपळाई रोडवर घर असून वरच्या मजल्यावर अतुल मुंढे हे पत्नी आणि मुलासह राहत होते. तर त्यांचे आई-वडील खालच्या मजल्यावर राहतात.

मंगळवारी सकाळी अतुल मुंढे यांचे आई-वडील दैनंदिन कामाला लागले. परंतु, उशीरापर्यंत वरच्या मजल्यावरून
कोणतीही हालचाल जाणवत नव्हती. कोणीही बाहेर आले नाही. यामुळे संशय आल्याने अतुल मुंढे यांच्या
आई-वडिलांनी त्यांचा दरवाजा ठोठावला. मात्र आतून कोणताही प्रतिसाद न आल्याने खिडकीतून डोकावून पाहिले
असता तृप्ती या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या असल्याचे दिसले.

यानंतर दरवाजा तोडून त्यांनी आतमध्ये प्रवेश केला असता मुलगा अतुल, नातू आणि सून तिघांचे मृतदेह आढळले.
हे दृश्य पाहून अतुल मुंढे यांच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला.

ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर ताबडतोब बार्शी पोलिसांना कळविण्यात आले.
यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. अतुल मुंढे यांनी हे भयंकर पाऊल का
उचलले त्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास बार्शी पोलीस करत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा, ”मराठी आणि हिंदुत्त्वाबद्दल फक्त तोंड वाजवायचं, नुसतं बाळासाहेबांचे विचार…”

CM Eknath Shinde | CM शिंदेंकडून भुजबळांच्या मागणीचे समर्थन, म्हणाले – ”तीच भूमिका सरकारचीही आहे…”

Sudamrao Landge Passed Away | पिंपरी-चिंचवडचे माजी उपमहापौर सुदामराव लांडगे यांचे निधन

Pune Pimpri Crime News | हटकले म्हणून तरुणावर दारूच्या बाटलीने जीवघेणा हल्ला, आकुर्डी येथील घटना