Pune Drug Case | ड्रग्स माफिया ललित पाटील, अरविंदकुमार लोहरे यांच्यासह 14 जणांवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 76 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

ललित पाटील कडून पुन्हा 5 किलो सोनं जप्त, एकूण 8 किलो सोनं जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ससून रुग्णालयातून राज्यभरात मोठे ड्रग्सचे रॅकेट (Pune Drug Case) चालवणाऱ्या ललित पाटील (Drug Mafia Lalit Patil) याच्यासह 14 जणांच्या टोळीवर पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी मोक्का कारवाई करत दणका दिला आहे. ललित पाटील सह 14 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यापासून 76 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का (Pune Police Mcoca Action) कायद्यान्वये कारवाई केली आहे. (Pune Drug Case)

गुन्हे शाखेने ससून हॉस्पिटल जवळ मोठी कारवाई करुन सुभाष मंडल याच्याकडून 2 कोटी 16 लाख 76 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. यामध्ये 2 कोटी 14 लाख 30 हजार 600 रुपयांचा 1 किलो 71 ग्रॅम 53 मि.ग्रॅ. मेफेड्रोन (एमडी – MD) हा अंमली पदार्थ जप्त केला होता. तर रौफ शेख याच्याकडून 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल व ललित पाटील याच्याकूडन 2 लाख 20 हजार रुपयांचे दोन मोबाईल, अंमली पदार्थ व इतर मुद्देमाल बेकायदेशिररित्या बाळगताना मिळाला होता. याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundagarden Police Station) एन.डी.पी.एस. अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Drug Case)

या गुन्ह्यात ललित अनिल पाटील (वय-37 रा. अक्षरधारा सोसायटी, फ्लॅट नं. 301, मातोश्रीनगर, उपनगर नाशिक), अरविंदकुमार प्रकाशचंद्र लोहरे (वय-39 रा. आराधना बिल्डींग, ओशिवरा, मुंबई), अमित शहा उर्फ अमित मंडल (वय-29 रा. शितला नगर, देहुरोड, पुणे), रौफ रहिम शेख (वय-19 रा. ताडीवाला रोड, पुणे), भूषण अनिल पाटील (वय-34,रा. अक्षरधारा सोसायटी, फ्लॅट नं. 301, मातोश्रीनगर, उपनगर नाशिक), अभिषेक विलास बलकवडे (वय-31 रा. विजय अ‍ॅनेक्स, टाकळी रोड, नाशिक), रेहान उर्फ गेलू आलम सुलतान अहमद अन्सारी (वय-26 रा. सुंदरम बिल्डिंग, धारावी, क्रॉस रोड, मुंबई मुळ रा. गोसाईगंज, अयोध्या, उत्तर प्रदेश), प्रज्ञा अरुण कांबळे उर्फ प्रज्ञा रोहित माहिरे

(वय-39 रा. डि. विंग, स्पेस ओरियन सोसायटी, नाशिक रोड, नाशिक), जिशान इकबाल शेख (वय-33 रा. फ्रेंड्स कॉलनी, उपनगीर, नाशिक), शिवाजी अंबादास शिंदे (वय-40 रा. कसारा रो हाऊस, एकता नगर, बोरगड, नाशिक), राहुल पंडित उर्फ रोहितकुमार चौधरी उर्फ अमितकुमार (वय-30 रा. जिवदाणी रोड, जनकपूर धाम, विरार (पूर्व) मुळ रा. जमवा पो. वाडी थाना सिंधिया जी. समस्तीपूर बिहार) यांना अटक केली आहे आहे. तर समाधान बाबाजी कांबळे (रा.नांदुर, नाशिक), इम्रान शेख उर्फ अमीर खान (रा. गणेश मंदिराजवळ, धारावी, मुंबई), हरिश्चंद्र उरावादत्त पंत (वय-29 रा. ओरयन बिल्डिंग, ठक्कर गॅलेक्सी, भोईसर (पश्चिम), मुंबई) हे आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

ललितचे ससून मधून पलायन

गुन्हे शाखेने (Pune Police Crime Branch) 30 सप्टेंबर रोजी ससुन हॉस्पिटलच्या समोर असलेल्या आंबेडकर पुतळ्याच्या कंम्पाउंड जवळील बस स्टॉप येथून सुभाष मंडल याला अटक करून दोन कोटी 14 लाखांचा अंमली पदार्थ जप्त केला. हे रॅकेट ललित पाटील रुग्णालयात बसून चालवत असल्याचे तपासात समोर आले. त्याला भूषण पाटील व बलकवडे, लोहरे तसेच इतर आरोपी मदत करत होते. मात्र, आपण या गुन्ह्यात सडले जाऊ आपल्याला कारागृहाबाहेर आता पडताच येणार नाही. या भीतीने ललित पाटील 2 ऑक्टोबर रोजी पळून गेला. गुन्ह्याचा तपास करत असताना पुणे पोलिसांनी तब्बल 3 किलो सोनेही जप्त केले. दरम्यान, ललित पाटील याला मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) साकीनाका पोलिसांनी परराज्यातून अटक केली. त्यानंतर पुणे पोलिसांनी त्याचा ताबा घेतला. सध्या ललित पाटील पुणे पोलिसांच्या कोठडीत असून त्याच्याकडे या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास सुरु आहे.

ललित पाटील कडून आणखी 5 किलो सोनं जप्त

अंमली पदार्थ विकून मिळालेल्या पैशातून ललित पाटील याने सोने विकत घेतले होते. त्यातील यापूर्वी तीन किलो सोने जप्त केले असतानाच आणखी पाच किलो सोने जप्त केले आहे. गुरुवारी पुणे पोलिसांची टीम ललित पाटीलला घेऊन नाशिकला गेली होती. त्यानंतर त्यांनी हे सोने जप्त केले आहे.

टोळीच्या माध्यमातून ड्रग्स तस्करी

ललित पाटील याचे पूर्वीचे रेकॉर्ड तपासले असता लिलत पाटील आणि अरविंदकुमार लोहरे याने स्वत:च्या
नेतृत्वाखाली संघटीत गुन्हेगारी टोळी तयार केली. त्यामध्ये वेगवेगळे सदस्य घेऊन मागील 10 वर्षात टोळीतल
सदस्यांनी एकट्याने किंवा संघटीतरित्या, अंमली पदार्थाचा साठा करणे, विक्री करणे, वाहतुक करणे व निर्मिती करणे
अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे निदर्शनास आले आहे.

मोक्का कारवाईचा प्रस्ताव

बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1)(ii),
3(2), 3(4) 3 (5), 4 या कलमांचा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुनिल तांबे
(ACP Sunil Tambe) यांनी पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende) यांच्या मार्फत
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale) यांना सादर केला होता.
या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली.
पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त सुनिल तांबे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil-Maratha Reservation | वेळ घ्या पण आरक्षण द्या, सरसकट आरक्षणासाठी 2 जानेवारीपर्यंत वेळ; जरांगे पाटलांनी उपोषण सोडले