Pune Drug Case | ड्रग्स माफिया ललित पाटील पलायन प्रकरण: रोझरी स्कूलचा संचालक विनय अरहानाला पुणे पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Drug Case | ड्रग्स माफिया ललित पाटील (Drug Mafia Lalit Patil) याने ससून हॉस्पिटलमधून (Sassoon Hospital) पलायन केल्यानंतर पुणे पोलिसांच्या (Pune Police) कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. या घटनेनंतर पुणे पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. काही दिवसांपूर्वी ललित पाटील याला मदत करणाऱ्या त्याच्या दोन मैत्रिणींना नाशिकमधून (Nashik) अटक केली. त्यानंतर आता ललित पाटील पलायन प्रकरणात पुण्यातील रोझरी स्कूलचा संचालक विनय अरहाना (Vinay Aranha Arrest) याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. (Pune Drug Case)

पुण्यातील रोझरी एज्युकेशन ग्रुपचा (Rosary School Pune) संचालक विनय अरहाना याला अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने अटक केली होती. सध्या तो येरवडा कारागृहात (Yerwada Jail) आहे. मात्र आजाराचे कारण देऊन तो ससून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता. याच दरम्यान त्याने ललित पाटील याला पळून जाण्यात मदत केल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणाच्या अधिक चौकशीसाठी विनय अरहना याचा ताबा मागितला होता. न्यायालयाने पुणे पोलिसांना अरहाना याचा ताबा घेण्याची परवानगी दिली. त्यानंतर पुणे पोलिसांनी अरहाना याचा येरवडा कारागृहातून ताबा घेतला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. (Pune Drug Case)

ललित पाटील कसा निसटला?

ड्रग्स माफिया ललित पाटीलला पळून जाण्यात रोझरी स्कूलचा संचालक विनय अरहाना याने मदत केल्याचे तपासात उघड झाले. ललित पाटील ससून हॉस्पिटलमधून निटल्यानंतर तो एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गेला. तिथून रिक्षाने तो सोमवार पेठेत गेला. तिथे दत्ता डोके हा विनय अरहानाच ड्रायव्हर ललित पाटीलसाठी कार घेऊन हजर होता. त्या कारमधून ललित पाटील पुण्यातील रावेत येथे पोहचला. तिथे पोहचल्यावर दत्ता डोके याने ललित पाटील याला विनय अरहाना याच्या सांगण्यावरुन दहा हजार रुपये दिले. ते पैसे घेऊन ललित आधी मुंबई आणि तिथून नाशिकला गेला आणि तिथून गायब झाला. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली.

अरहाना आणि पाटीलची ओळख कशी झाली?

ललित पाटील आणि विनय अरहाना या दोघांची ओळख ससून हॉस्पिटलमध्ये कैद्यांवर जिथे उपचार केले जातात त्या
वॉर्ड क्रमांक 16 मध्ये झाली. याच ओळखीतून अरहाना याने ललित पाटील याला पळून जाण्यात मदत केली.
विनय अरहाना याने एका बँकेकडून 46 कोटींचे कर्ज घेतले होते. मात्र, ज्या कामासाठी कर्ज घेतले त्या कामासाठी पैसे खर्च
न करता इतर ठिकाणी पैसे खर्च केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या आरोपांखाली अरहानाला ईडीने अटक केली आहे.
मात्र, आजरपाणाचे कारण देत तो ससून हॉस्पिटलमधील वॉर्ड क्र. 16 मध्ये उपचार घेत होता.
याच दरम्यानं त्याची ललित पाटीलसोबत ओळख झाली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | जुन्या भांडणाच्या वादातून हडपसरमध्ये 22 वाहनांची तोडफोड, तिघांना अटक (Video)

Sambhajiraje Chhatrapati Meet Manoj Jarange Patil | संभाजीराजेंनी तातडीने घेतली जरांगे यांची भेट, म्हणाले – मला एका गोष्टीची भीती वाटतेय…