Pune Drug Case | ड्रग्स तस्कर ललित पाटीलच्या आईचा गंभीर आरोप; म्हणाल्या – ‘दिसेल तिथे त्याचं एन्काऊंटर करा, पुढार्‍यांचे पोलिसांना आदेश’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Drug Case | ड्रग्स माफिया ललित पाटील (Drug Peddler Lalit Patil) पोलिसांच्या ताब्यातून फरार झाला आहे. या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाल्याने सत्ताधारी मंत्री तसेच विरोधी पक्षांनी या प्रकरणावरुन एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यातच शुक्रवारी या प्रकरणाला आणखी एक वळण मिळाले आहे. ललित पाटील याच्या आईने धक्कादायक (Lalit Patils Mother Serious Allegations) गौप्यस्फोट केला आहे. (Pune Drug Case)

राजकीय नेत्यांनी पोलिसांना सांगितले आहे की ललित जिथं असेल तिथं त्याचा एन्काउंटर करा. टीव्हीला दाखवल्यापासून आम्हाला धक्काच बसला आहे. मुलानं असं केलं, ते चुकीचं आहे. या गोष्टीची मला कल्पना नव्हती, अशी प्रतिक्रिया ललित पाटीलची आई भाग्यश्री पाटील यांनी दिली आहे. या गंभीर आरोपामुळे खळबळ उडाली आहे. (Pune Drug Case)

ललित पाटीलचा भाऊ भूषण आणि साथीदार अभिषेक बलकवडे यांना नेपाळ सीमेवरुन पुणे पोलिसांच्या पथकाने अटक केली.
पोलिसांचे पथक अभिषेकला घेऊन नाशिकला रवाना झाले. अभिषेककडे चौकशी करण्यात आली.
ललित आणि त्याचा भाऊ भूषण अमली पदार्थ विक्रीतून मिळालेल्या पैशातून मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केले
तसेच नाशिक परिसरात जमीन खरेदी कल्याचे उघडकीस आलं आहे. ललित अमली पदार्थांच्या विक्रीचे व्यवहार
सांभाळत होता. तर भूषण आणि अभिषेक मेफेड्रोन तयार करत होते.

भूषणने रासयनशास्त्रात अभियांत्रिकी चे शिक्षण घेतले आहे. रासायनिक पदार्थांची त्याला चांगली माहिती होती.
नाशिक परिसरात शिंदे गावात त्यांनी मेफेड्रोन तयार करण्याचा कारखाना सुरु केला होता.
ललित मुंबईतील तस्करांना मेफेड्रोन कसे तयार केले जाते, याची माहिती देणार होता.
यासाठी त्याला मोठी रक्कम मिळणार होती, अशी माहिती तपासात समोर आली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Police Inspector Promotion ACP / DySP | राज्यातील 104 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना सहाय्यक पोलिस आयुक्त / पोलिस उपअधीक्षक पदी बढती