Pune Drug Case | ड्रग्स प्रकरणातील आरोपी अभिषेक बलकवडेच्या घरातून कोटयावधी रूपयाचं सोनं जप्त, पोलिसांनी केलं ‘एवढे’ किलो Gold हस्तगत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Drug Case | ससून रूग्णालयात (Sasoon Hospital) उपचार घेणारा अंमली पदार्थ तस्कर ललित अनिल पाटील (Drug Peddler Lalit Anil Patil) याने पलायन केल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (Pune Police Crime Branch) ललित पाटीलचा भाऊ भूषण अनिल पाटील (Bhushan Anil Patil) आणि त्याचा साथीदार अभिषेक विलास बलवकडे (Abhishek Vilas Balkawade) यांना नेपाळ बॉर्डरवरून अटक केली. त्यांना पुण्यात आणण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्यांची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे. दरम्यान, पोलिसांनी बलकवडेच्या नाशिक येथील घराची झडती केली असता त्यामध्ये तब्बल 3 किलो सोनं आढळून आलं आहे. पोलिसांनी ते जप्त केलं असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने दिली आहे. (Pune Drug Case)

कोटयावधी रूपयांचे सोनं जप्त करण्यात आल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे. पलायन करण्यासाठी घरामध्ये लपवुन ठेवलेल्या सोन्याचा वापर केला जाणार होता असं देखील पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं आहे. दरम्यान, अभिषेक बलकवडेने हे सोने ड्रग्सची तस्करी करूनच कमविल्याचे देखील निष्पन्न झाले आहे. ललित पाटील आणि अभिषेक बलकवडे हे दोघे भेटल्याचं देखील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झालं आहे. (Pune Drug Case)

दोघांच्या भेटीचा सीसीटीव्ही सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. मात्र, त्या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा
झाली याबाबत पोलिस अभिषेककडे विचारणा करीत आहेत. अभिषेक बलकवडेने ड्रग्सची तस्करी करून आणखी
काही मालमत्ता जमवली आहे काय याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap News | लाच घेताना महिला दुय्यम निबंधक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

ACB Trap On Two Police Officers | 1 लाख रूपयाची लाच घेताना सहाय्यक पोलिस निरीक्षक (API) अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात, पोलिस उपनिरीक्षक (PSI) देखील गोत्यात, 2 अधिकार्‍यावरील कारवाईने पोलिस दलात प्रचंड खळबळ