Pune : फर्ग्युसन रस्त्यावरील ATM सेंटरमध्ये महिलेसह एकाची एन्ट्री, मशिनमध्ये छेडछाड करून 5 लाख काढले

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – कायम गर्दीने फुल असलेल्या फर्ग्युसन रस्त्यावरील कॅनरा बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यास शिरलेल्या महिलेने आणि तिच्यासोबतच्या व्यक्तीने मशीनमध्ये छेडछाड करून तब्बल 5 लाख रुपये काढल्याचा प्रकार समोर आला आहे. 18 मार्चला ही घटना रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

याप्रकरणी श्रद्धा कोकणे (वय 30) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अनोळखी महिला व पुरुषावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फर्ग्युसन रस्त्यावर स्नेहा सेंटरमध्ये कॅनरा बँकेचे एटीएम मशीन आहे. गेल्या आठवड्यात ( दि18 मार्च) सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास एक महिला आणि एक पुरुष एटीएम सेंटरमध्ये आले. ते पैसे काढण्यासाठी म्हणून आत शिरले होते. आत आल्यानंतर प्रथम ते एटीएम मशीनच्या पाठीमागे गेले. त्यानंतर एटीएम मशीनमध्ये काहीतरी छेडछाड केली. त्यानंतर 5 वेळा ट्रांजेक्शन पुरूषाने 1 लाख काढले. त्यानंतर महिलेने त्याच एटीएम मशीनमध्ये टाकत 15 ट्राजेक्शनकरून तब्बल 4 लाख रुपये काढले. यानंतर तर दोघे येथून निघून गेले. बँकेला काही वेळानंतर हा प्रकार समजला. त्यांनी माहिती घेतली. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक गौड करत आहेत.