Pune Excise Department Action On Ballr Pub | पुण्यात आणखी एका पबमधून अल्पवयीन मुलांना दारूचा पुरवठा; राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा

पुणे : Pune Excise Department Action On Ballr Pub | पुण्याच्या कल्याणीनगर भागात एका अल्पवयीन मुलाने भरधाव पोर्शे कार चालवत बाईकवर असलेल्या तरुण आणि तरुणीला चिरडल्याची घटना घडली होती. या घटनेत अभियंता तरुणीचा आणि तरुणाचा मृत्यू झाला.

दरम्यान त्यानंतर आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला लगेचच जामीन मिळाला होता. आरोपीला जामीन मिळाल्याने वातावरण चांगलंच तापलं होतं. त्यानंतर आता त्याचा जामीन रद्द करत त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली. या हायप्रोफाईल प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून सुरू आहे. (Pune Excise Department Action On Ballr Pub)

दरम्यान चोहोबाजुंनी टीका झाल्यानंतर आता पोलीस विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, महापालिका ही यंत्रणा अनधिकृत पब च्या संदर्भाने कारवाईसाठी पुढे सरसावल्या आहेत. अशातच आता पुण्यातील ‘बॉलर’ पबवर (Ballr Pub) राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून धडक कारवाई करण्यात आली आहे.

शनिवारी रात्री उशिरा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
पार्टी सुरू असतानाच उत्पादन शुक्ल विभागानं पबवर छापा टाकला.
रजिस्टर मेंटेन न करणे, प्रिमायसेसच्या बाहेर दारू विक्री करणे, अल्पवयीन मुलांना दारू विक्री करणे,
अशी अनेक कारण दाखवत या पब वर कारवाई करण्यात आली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut On Ajit Pawar | अजित पवाराचे उमेदवार पाडण्यासाठी शिंदे आणि यंत्रणेचे खास प्रयत्न,
निवडणुकीत ‘समृद्धी’ने डोळे दिपले : संजय राऊत

Sharad Pawar | शरद पवारांना मोठा धक्का; दोन नेते साथ सोडणार?

Ajit Pawar | अजित पवारांच्या रडारवर कोण? कोणाची जाणार खुर्ची, पदाधिकारी टेन्शनमध्ये…