Ajit Pawar | अजित पवारांच्या रडारवर कोण? कोणाची जाणार खुर्ची, पदाधिकारी टेन्शनमध्ये…

बारामती : Ajit Pawar | शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) फुटल्याने राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या. लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात नव्हे तर देशात बारामती लोकसभा मतदारसंघ (Baramati Lok Sabha) कमालीचा चर्चेचा ठरला.

या मतदारसंघात सुप्रिया सुळे (Supriya Sule) विरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Ajit Pawar) निवडणुकीसाठी रिंगणात होत्या. या मतदारसंघात विजयासाठी महायुतीने तसेच महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) मोठी ताकद लावल्याचे पाहायला मिळाले.

अनेक सभांमध्ये तर अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दमच भरला असल्याचे व्हिडिओ समाजमाध्यमात व्हायरल होत आहेत. “तालुक्यात पिलावळीमुळे जर दगाफटका झाला तर त्यांची हयगय करणार नाही” असा सज्जड दमच अजित पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना तसेच पदाधिकाऱ्यांना दिलेला होता.

त्यामुळे प्रत्येकजण आपली खुर्ची , पद टिकवण्यासाठी प्रचार करताना दिसून येत होता.
या निवडणुकीदरम्यान अजित पवारांनी आपले राजकीय वैमनस्य असलेल्या
अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेत त्यांच्याशी मैत्री केल्याचेही चित्र पाहायला मिळाले.

जर या निवडणुकीत अजित पवारांच्या घडाळ्याला मतदान कमी झालेले असेल त्या गावातील तालुक्यातील पदाधिकारी अजित पवारांच्या रडारवर असणार आहेत.
त्यामुळे चर्चा अशी होतेय की ४ जूनला या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निकाल आहे.
त्यावेळी अजित पवारांच्या रडारवर कोण असणार? याबाबत पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये कुजबुज असल्याचे दिसत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PCMC News | मंगळसूत्र विकून, सोने गहाण ठेऊन पूर रेषेतील बांधकामांसाठी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतील अधिकाऱ्यांना पैसे दिल्याचा आरोप

Ravindra Dhangekar On Ajit Pawar | पोर्शे कार अपघातावरून धंगेकरांचा अजितदादांवर निशाणा,
”त्यांची भाषा सैल झालीय, फडणवीसांनी हातपाय बांधून खुर्चीत ठेवलंय” (Video)

Porsche Car Accident Pune | सुरेंद्रकुमार अग्रवालने ड्रायव्हरला खोलीत डांबले; ड्रायव्हरच्या बायकोने आरडाओरडा केल्यानंतर सुटका (Videos)