Pune Excise Department Action On Pubs & Bars | उत्पादन शुल्क विभागाकडून कल्याणीनगर, मुंढवा भागातील 14 पब, बारवर कारवाई

पुणे: Pune Excise Department Action On Pubs & Bars | पुण्याच्या कल्याणीनगर येथे पोर्शे कारची धडक बसून दोघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे वातावरण प्रचंड तापले आहे (Porsche Car Accident Pune). एका धनिकाच्या अल्पवयीन मुलाने लायसन्स नसताना आणि दारूच्या नशेत असतानाही ही कार भरधाव वेगाने चालवून बाईकला धडक दिली, ज्यामध्ये दोघांना जीव गमवावा लागला. आठवड्याभरापासून चालू असलेल्या या केसमध्ये रोज नवनवे अपडेट्स समोर येत आहेत. (Kalyani Nagar Accident)

या अपघाताच्या घटनेनंतर मात्र पोलीस विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग , महापालिका हे अनधिकृत पब वरील कारवाईसाठी चांगलीच सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाईचा धडाका सुरु आहे. (Pune Excise Department Action On Pubs & Bars)

शनिवारी रात्री उत्पादन शुल्क विभागाने कल्याणीनगर (Pubs In Kalyani Nagar), मुंढवा (Pubs In Mundhwa) भागातील १४ पब, बारवर कारवाई केली. बॉलर पबवर देखील जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक वसंत कौसडीकर (Vasant Kausudikar) यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

मद्य विक्री नियमावलीचे, एक्साईज रजिस्टरमध्ये नोंदी योग्य नसल्याने या पबवर कारवाई करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंह रजपूत (Charan Singh Rajput) यांनी दिली. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ” मद्य विक्री नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील पब, बार, रेस्टॉरंट आणि रूफ हॉटेल्सविरोधात कारवाई करण्यात आली आहे.”

आठवडभरात ५४ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे.
परवाना निलंबित केल्यानंतर संबंधित बार, पब सील करण्यात आले आहेत.
कल्याणीनगर, मुंढवा, कोरेगाव पार्क, बाणेर-बालेवाडी भागातील पब, बारविरोधात कारवाई करण्यात आली.
शनिवारी रात्री तरुणाईची या भागात गर्दी असते. एकाच वेळी १४ पब, बारविरोधात कारवाई करून
त्यांना सील करण्यात आल्याने या भागात कमालीची शांतता पाहण्यास मिळाली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut On Ajit Pawar | अजित पवाराचे उमेदवार पाडण्यासाठी शिंदे आणि यंत्रणेचे खास प्रयत्न,
निवडणुकीत ‘समृद्धी’ने डोळे दिपले : संजय राऊत

Sharad Pawar | शरद पवारांना मोठा धक्का; दोन नेते साथ सोडणार?

Ajit Pawar | अजित पवारांच्या रडारवर कोण? कोणाची जाणार खुर्ची, पदाधिकारी टेन्शनमध्ये…