Pune : रविंद्र बर्‍हाटे, विजय नागोरी, युवराज कोतवाल, सुबोध ओसवाल यांच्याविरूध्द जमिन बळकावण्याचा कट केल्याप्रकरणी FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – माहिती अधिकार कार्यकर्ता अन मोक्काच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी रविंद्र बऱ्हाटे याच्यासह इतरांवर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. एकता सहकारी गृहरचना संस्थेची जमिन बळकावण्याचा कट रचला असल्याबाबत हा गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारीत म्हटले आहे. त्याच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार 2006 ते एप्रिल 2021 दरम्यान घडला आहे.

याप्रकरणी संस्थेचे चेअरमन राजेंद्र साठे (वय 65) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रविंद्र लक्ष्मण बऱ्हाटे (लूल्लानगर), विजय मांगीलाल नागोरी (वय 55, शंकरशेठ रोड), युवराज सुरेश कोतवाल (लक्ष्मी रोड), सुबोध त्रलोकचंद ओसवाल(वय 44, रा.गुलटेकडी) आणि मॅक ड्रॉप इंडिया लिमिटेड(शनिवार पेठ) यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी हे एकता सहकारी संस्थेचे चेअरमन आहेत. संस्थेची धनकवडी येथे शाखा आहे. संस्थेची याच भागात एक एकर एक आर जमिन आहे. ही जमिन बळकावण्यासाठी आरोपींनी कट रचला होता. दरम्यान संस्थेचे सेक्रेटरी पदाबाबत याबाबत न्यायालयात दावा सुरू होता. काही महिन्यांपूर्वी उच्च न्यायालयाने सुध्दा साठे हेच संस्थेचे चेअरमन असल्याचा निकाल दिला. पण, असे असतानाही आरोपींनी कट रचून संस्थेचे शिक्के, लेटर हेड आणी प्रोसिडिंग बुक बनावट तयार केले. यानंतर संस्थेची सभा झाल्याचे भासवून तशी प्रोसेडिंग बुकमध्ये नोंद केली. यानंतर तलाठ्यांकडे जाऊन रविंद्र बऱ्हाटे हा संस्थेचा सेक्रेटरी व सुधाकर खवले हा चेअरमन असल्याचे भासवले. त्याप्रमाणे तलाठ्याकडून सात बाराच्या उताऱ्यावर स्वत:ची नावे लावून घेतली.

यानंतर ही जागा गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला. तसेच सुबोध ओसवाल व मॅक ड्रॉफ इंडिया लिमीटेड हे संस्थेचे सभासद नसतानाही त्यांनी बनावट लेटर हेड व शिक्का बनवला. यानंतर संस्थेची कोणतीही सभा झाली नसताना ती झाली असल्याच भासवत विजय मांगिलाल नागोरी व सुबोध त्रिलोकचंद ओसवाल हे सेक्रेटरी असल्याचे सभासदांना भासवले, असे तक्रारीत म्हंटले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम करत आहेत.