Pune Fire News | पुण्यालगतच्या एमआयडीसीतील वॉटर प्युरीफायर कंपनीमध्ये भीषण आग; 18 कर्मचार्‍यांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुळशी तालुक्यातील उरवडे येथील औद्योगिक वसाहतीतील एसव्हीएस ऍक्वा टेक्नॉलॉजिज या वॉटर प्युरीफायर कंपनीमध्ये आज दुपारी लागलेल्या आगीमध्ये Fire १८ कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला असून दोन कर्मचारी बेपत्ता आहेत. तर, १९ कामगारांना वाचवण्यात यश आलं आहे. मृत कर्मचार्‍यांमध्ये बहुतांश महिला कर्मचारी असून त्यांची ओळख पटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

एसव्हीएस ऍक्वा टेक्नॉलॉजिज या कंपनीमध्ये वॉटर प्युरीफायर तयार केले जातात. यासाठी काही प्रमाणात क्लोरीन डाय ऑक्साईड या केमिकलचाही वापर होतो. प्राथमिक माहितीनुसार याठिकाणी ३७ कर्मचारी काम करत होते. यामध्ये बहुतांश महिला कर्मचार्‍यांचा समावेश होता. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कंपनीमध्ये आग Fire लागल्यानंतर काहीवेळात धुराचे लोट आकाशाला भिडू लागले. कंपनी बंदीस्त असल्याने आतील कर्मचार्‍यांना बाहेर पडणेही अवघड जात होते. अशातच केमिकलच्या धुरामुळे श्‍वास घेणेही अवघड झाले होते. आग लागल्याची माहिती मिळताच पीएमआरडीए आणि एमआयडीसी अग्निशामक दलाची वाहने काही वेळातच घटनास्थळी दाखल झाली. साधारण तास- दीड तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर Fire नियंत्रण मिळविण्यात आले. यासाठी आठहून अधिक बंब आणि भिंत तोडण्यासाठी जेसीबीचाही वापर करण्यात आला. परंतू रसायनांमुळे आगीने काहीवेळातच उग्र रुप धारण केले होते. त्यामुळे आतील कर्मचार्‍यांना बाहेर पडण्यास वेळच मिळाला नाही. अशाही परिस्थितीत काही कर्मचार्‍यांनी प्रसंगावधान राखत बाहेर पळ काढल्याने ते बचावले. परंतू साधारण १८ कर्मचारी आतच अडकून पडले.

अग्निशामक दलाने जेसीबीच्या सहाय्याने कंपनीच्या इमारतीची भिंत फोडून वाट काढण्याचा प्रयत्न केला.
पहिल्या टप्प्यात महिलांसह ७ कर्मचार्‍यांचे मृतदेह हाती लागले.
तर आग पुर्णत: आटोक्यात आल्यानंतर आणखी ११ कर्मचार्‍यांचे मृतदेह आढळून आले.
रात्री उशिरापर्यंत कुलिंगचे काम सुरू होते. आगीचे कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही.

जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे, आमदार संग्राम पाटील यांच्यासह प्रमुख नेत्यांनी घटनास्थळी भेट देउन पाहाणी केली.
खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेबद्दल दुख व्यक्त करताना जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याशी संपर्क साधून सर्वतोपरी सहकार्य करण्याची विनंती केली.
या आगीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येईल, असे घटनास्थळी भेट दिल्यानंतर जाहीर केले.
यामध्ये उपजिल्हाधिकारी, पीएमआरडीएचे चीफ फायर ऑफीसर, एमआयडीसीचे अधिकारी, पोलिस अधिकार्‍यांचा समावेश असेल.

डीएनए तपासणी करणार
आगीमध्ये मरण पावलेल्यांचे मृतदेह ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. मृतदेह गंभीररित्या जळाल्याने डीएनए टेस्टही केली जाणार आहे. यानंतर ओळख पटवून मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन केले जाणार आहे. या कंपनीमध्ये वॉटर प्युरीफायर तयार करण्याचे काम करण्यात येते. पॅकिंगसाठी क्लोरीन डाय ऑक्साईडचा वापर करण्यात येतो. हे ज्वलनशिल असते. पँकींगचे काम सुरू असताना एका पंपाच्या स्फोटाचा आवाज झाला आणि आग लागली, अशी प्राथमिक माहिती घटनास्थळी मिळाली आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचा चौकशी अहवाल आल्यानंतर आगीचे निश्‍चित कारण समजू शकेल, अशी माहिती पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे यांनी दिली.

Also Read This : 

जेव्हा सेक्स स्कँडलमध्ये फसले ‘हे’ 5 प्रसिद्ध क्रिकेटर, मॉडलसह सोबत ‘या’ आवस्थेत दिसला होता पीटरसन

Coronavirus : दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,219 नवीन रुग्ण, तर 21,081 जणांना डिस्चार्ज