Pune : खराडीतील ‘पाल्म ट्री डेव्हलपमेंट’मध्ये फ्लॅट बुकिंग केल्यानंतर 23 लाखांची फसवणूक; अनुराग खेमका आणि संदीप पाटीलविरूध्द FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   खराडीत सुरू असलेल्या पाल्म ट्री डेव्हलपमेंट या बहुमजली बांधकाम साईटमध्ये फ्लॅट बुकिंगकरून त्यांच्याकडून 23 लाख रुपये घेऊन दोघांची फसवणूक करण्यात आली आहे. पैसे घेतले आणि खरेदीखत न करता तसेच फ्लॅट व पैसे न देता फसवणूक झाली आहे.

याप्रकरणी पुनीत सुरेश वाणी (वय 35, रा. खराडी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अनुराग खेमका (रा. मुंबई) आणि संदीप पाटील (रा.पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना फ्लॅट घ्यायचा होता. यादरम्यान, खेमका यांची खरडीत पाल्म ट्री डेव्हलपमेंट बहुमजली बांधकाम साईट सुरु आहे. तर संदीप पाटील हा सेल्स पर्सन आहे. फिर्यादी यांनी या बहुमजली इमारतीमधील फ्लॅट क्रमांक 1005 पाहिला. आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून 13 लाख रुपये घेतले. तसेच, आणखी एका व्यक्तीकडून फ्लॅटसाठी 10 लाख रुपये घेतले. मात्र, त्यांना खरेदीखत न देता तसेच त्यांना पैसे परत न करता त्यांची फसवणूक केली आहे. हा सर्व प्रकार 2019 ते 2021 या कालावधीत घडला आहे. अधिक तपास चंदननगर पोलीस करत आहेत.