Pune Ganesh Festival | राष्ट्रीय एकात्मतेबरोबर अर्थव्यवस्थेला चालना देणारा उत्सव

पुणे – Pune Ganesh Festival | जगातील 121 देशात गणेशोत्सव (Pune Ganesh Festival) साजरा केला जात असून त्याने राष्ट्रीय एकात्मतेबरोबरच देशाच्या अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळते असे प्रतिपादन पुण्याच्या गणेशोत्सवाचे जाणकार अभ्यासक आनंद सराफ (anand saraf) यांनी रविवारी येथे केले.

कोथरुड येथील सक्सेस स्केअर सोसायटीच्या (success square kothrud) सार्वजनिक गणेशोत्सवात  प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मंडळाचे अध्यक्ष आशिष शिंदे (Ashish Shinde Kothrud) अध्यक्षस्थानी होते. सोसायटीचे अध्यक्ष नागेश नलावडे, सचिव प्रदीप काजळे, शास्त्रीय गायक अमेय बनसोड आदी यावेळी उपस्थित होते.

Aurangabad Crime | धारदार शस्त्राने 18 वर्षीय युवकाची हत्या; धक्कादायक कारण समोर, शहरात प्रचंड खळबळ

सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात महाराष्ट्रात 1890 च्या दशकात झाली. लोकांना एकत्र आणण्याची व एका विचाराने पुढे नेण्याची त्याची क्षमता ओळखून लोकमान्यांनी त्याला सार्वजनिक गणेशोत्सवाचे (Pune Ganesh Festival ) स्वरुप दिले व त्यातून स्वातंत्र्य चळवळीसाठी सर्व समाज एकत्र येऊ शकला. इंग्रजांनी सुरुवातीपासून या उत्सवात विघ्ने आणण्याचा व निर्बंध लादण्याचा प्रयत्न केला. परंतु, या सर्व विघ्नांवर व निर्बंधांवर मात करीत हा उत्सव दिवसेंदिवस वर्धिष्णू होत गेला. अठरा पगड जाती धर्माचे लोक त्यामुळे एकत्र आले त्यातून समाजाची बांधणी झाली, या उत्सवाने आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देत देशाला दिशा देणारे नेतेही घडविले,असेही सराफ यांनी सांगितले.

सराफ पुढे म्हणाले की, भारत हा कृषीप्रधान देश. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था ही शेती आणि शेती उत्पादनावर आधारलेली. पेरणी झाल्यानंतर धान्य खळ्यावर येईपर्यंतच्या काळात शेतकऱ्याच्या हाताला कसलेच काम नसते. परिणामी या काळात अर्थव्यवस्थेचा वेग मंदावतो. नेमका याच काळात गणेशोत्सव येतो. गणपतीच्या मूर्तीची निर्मिती, त्याचे मंडप, सजावटीचे तसेच पूजेचे साहित्य आदींची उलाढाल याच काळात वाढते. या साठी हजारो कोटी रुपयांची उलाढाल होते. त्यामुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी प्राप्त होते. विविध राज्यातील अठरा पगड जाती धर्माच्या कारागिरांच्या, कलावंताच्या हाताला त्यामुळे काम मिळते. यातूनच आपोआप राष्ट्रीय एकात्मतेलाही चालना मिळते.

प्रसिद्ध गायक अमेय बनसोड यांनी यावेळी स्वरचित व प्रसिद्ध संगीत शिक्षक सुधाकर तळणीकर यांनी संगीतबद्ध केलेला अभंग सादर करून आपली सेवा रुजू केली.
मंडळाचे अध्यक्ष आशिष शिंदे यांच्या हस्ते सराफ यांचा तर संस्थेचे अध्यक्ष नागेश नलावडे यांच्या हस्ते बनसोड यांचा सत्कार करण्यात आला.
शीतल गुर्जर यांनी स्वागत केले.
संस्थेचे सचिव प्रदीप काजळे यांनी प्रास्ताविक केले.
श्रीकांत गुर्जर यांनी सूत्रसंचलन केले तर हिमांशू फडके यांनी आभार मानले.

हे देखील वाचा

Shiv Sena | महाराष्ट्रात कायद्याचेच राज्य; मुंबई हे महिलांसाठी जगातील अत्यंत सुरक्षीत शहर

ACP Vijay Chaudhary | ACP आणि ट्रीपल महाराष्ट्र केसरी ठरलेले पै. विजय चौधरी गणरायासमोर ‘बेभान’ होतात तेव्हा… (व्हिडीओ)

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Ganesh Festival | A celebration that drives the economy along with national unity

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update