Pune Ganeshotsav 2023 | बाप्पाला निरोप देताना कुटुंबाचं मुलाकडं दुर्लक्ष, चार वर्षाच्या चिमुकल्यानं घेतला अखेरचा निरोप; मायलेकरांचा ‘तो’ सेल्फी ठरला अखेरचा, पिंपरी-चिंचवड परिसरातील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरामध्ये गणपती विसर्जन मिरवणूक (Pune Ganeshotsav 2023 ) मोठ्या उत्साहात पार पडली. गणेश भक्तांनी पाणावलेल्या डोळ्यांनी बाप्पांना निरोप दिला. मात्र या उत्सवाला पिंपरी चिंचवडमध्ये गालबोट लागलं. मोशी येथे गणपती विसर्जन (Pune Ganeshotsav 2023) सुरु असताना चार वर्षाच्या चिमुकल्याचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अर्णव आशिष पाटील असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

ही घटना मोशी येथील मंत्रा सोसायटी येथे गुरुवारी सायंकाळी घडली आहे. अर्णव हा सोसायटीमधील गणपती विसर्जन टाकीच्या शेजारी उभा राहून बघत होता. लेझीमच्या ठेक्यावर सोसायटीमधील सर्व सदस्य नाचत होते. त्यावेळी अचानक अर्णव पाण्याच्या टाकीत पडला. अर्णव पाण्यात पडल्याचे कोणाच्या लक्षात आलं नाही. यासंबंधीचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

मोशी येथील मंत्रा सोसायटीमध्ये गणपती बसवण्यात आला होता. त्याचं विसर्जन काल सायंकाळी करण्यात आलं. अर्णव हा त्याच्या आई-वडिलांसह या विसर्जनाच्या कार्यक्रमात सहभागी झाला होता. पाटील कुटुंब बाप्पाला निरोप देत होतं. त्यावेळी अर्णव पाण्याच्या बाजूला कठड्यावर उभा होता आणि विसर्जन मिरवणुकीचा (Pune Ganeshotsav 2023) आनंद घेत होता. अचानक तो टाकीत पडला अन् त्याने जगाचा निरोप घेतला.

अर्णव दिसत नसल्याने त्याच्या आई-वडिलांनी त्याचा शोध घेतला. काही वेळाने टाकीचे झाकण उघडे दिसले.
त्यात पाहिले असता अर्णव पाण्यात आढळून आला. त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाण्यात आलं.
मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. उपचापूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आलं. या घटनेमुळे पाटील कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

तो सेल्फी अखेरचा ठरला

अर्णव आणि त्याचे आई-वडील मोठ्या उत्साहामध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते.
अर्णवने पांढरा शुभ्र पोशाख परिधान केला होता. विसर्जनादरम्यान अर्णव आणि त्याच्या आईने एक सेल्फी घेतला होता.
हा सेल्फी शेवटचा ठरल्याचे सांगण्यात येत आहे. या फोटोमध्ये दोघेही खूप आनंदात दिसत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar On Chandrashekhar Bawankule | ‘जे अशी भूमिका घेतात, त्यांच्याबद्दल…’, बावनकुळेंच्या ‘त्या’ विधानावर शरद पवारांची प्रतिक्रिया