
Sharad Pawar On Chandrashekhar Bawankule | ‘जे अशी भूमिका घेतात, त्यांच्याबद्दल…’, बावनकुळेंच्या ‘त्या’ विधानावर शरद पवारांची प्रतिक्रिया
बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – Sharad Pawar On Chandrashekhar Bawankule | पत्रकारांनी 2024 पर्यंत आपल्याविरोधात (भाजपा – BJP) बातम्या छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला न्या. पत्रकारांना चहा प्यायला न्यायचं म्हणजे काय ते तुम्हाला समजलंच असेल. तसेच पत्रकारांना ढाब्यावर जेवायला घेऊन जा, असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नगरमध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले होते. या विधानावरुन राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहे. याबाबत राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar On Chandrashekhar Bawankule) यांनी बारामतीत पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांना टोला लगावला आहे. महाराष्ट्रातील पत्रकारांची तशी प्रतिमा नसल्याचे शरद पवार म्हणाले.
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या विधानानंतर भाजपच्या राज्यातील अनेक वरिष्ठ नेत्यांनी त्यांची बाजू घेत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. परंतु, आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर सूचक शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार शुक्रवारी (दि.29) बारामती दौऱ्यावर असून गोविंद बाग या त्यांच्या निवासस्थानी स्थानिक पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी ते घेणार आहेत.
काय म्हणाले शरद पवार?
शरद पवारांना (Sharad Pawar On Chandrashekhar Bawankule) पत्रकार परिषदेत चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानाबाबत विचारणा करण्यात आली. त्यावर बोलताना ते म्हणाले, अशा विधानाला फारसं महत्व देण्याची गरज नाही. आता काय त्या विधानाला महत्व द्यायचं एवढं. महाराष्ट्रातले पत्रकार या गोष्टींची अपेक्षा करत नाहीत. महाराष्ट्रातले कोणते पत्रकार ढाब्यावर जाण्यासाठी, चहासाठी भुकेले आहेत? महाराष्ट्राच्या पत्रकारांची अशी प्रतिमा नाही. असं वक्तव्य करणं म्हणजे समस्त पत्रकार वर्गाचा अवमान आहे. अशी भूमिका जे घेतात, त्यांच्याबद्दल काय बोलावं? माझ्यामते अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करायला हवं, असं ते म्हणाले.
रोहित पवारांच्या नोटीसवर एका वाक्यात उत्तर
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांना मध्यरात्री
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (Maharashtra Pollution Control Board) नोटीस देत बारामती अॅग्रोचे
(Baramati Agro) दोन प्लांट बंद करण्याच्या सूचना केल्या आहेत. सूडबुद्धीने कारवाई करण्यात आल्याचा आरोप
रोहित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी केला आहे. मात्र शरद पवार यांनी यावर सविस्तर बोलण्यास
नकार दिला. त्यांना बारामती अॅग्रोबाबत प्रश्न विचारला असता त्यावर ‘मी कारवाईबाबत बोलणार नाही’ असं म्हणत
त्यांनी अधिक भाष्य करणं टाळलं.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
29 September Rashifal | वृषभ, धनु आणि कुंभसह तीन राशींचे उत्पन्न वाढणार, वाचा दैनिक भविष्य
ACB Trap Case News | महिला शेतकऱ्याकडून लाच घेताना तलाठी व कोतवाल अँन्टी करप्शनच्या जाळ्यात