Pune Ganeshotsav | पुणेकरांना गणेशोत्सवासाठी महापालिकेने जारी केल्या मार्गदर्शक सूचना

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  गतवर्षी प्रमाणे याहीवर्षी पुण्यातील गणेशोत्सवावर (Pune Ganeshotsav) कोरोनाचे (Corona) सावट दिसत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे (third wave) संकेत देण्यात आले असून सर्वत्र योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदाही पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव (Pune Ganeshotsav) साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन पुणे महापालीकेने (Pune Municipal Corporation) पुणेकरांना केले आहे. या संदर्भात काही मार्गदर्शक (Guidelines) सूचना जारी केल्या आहेत.

कोरोनामुळे सलग दुसऱ्यावर्षी गणेशोत्सवात मिरवणुकांवर बंदी घालण्यात आली आहे.
प्राणप्रतिष्ठा आणि विसर्जनावेळी ढोल ताशांच्या तालावर मिरवणूक काढता येणार नाही.
गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यासाठी याआधी राज्य सरकारनं (State Government) नियमावली जारी केली आहेच. आता महापालिकेनेही सूचना जारी केल्या आहेत.

अशी आहे नियमावली

मंडळाची गणेश मूर्ती 4 फूट तर घरगुती मूर्ती 2 फूट असावी, मंडळांना मंडप लहान उभारावे लागणार असून त्यासाठी पालिकेकडून परवानगी घ्यावी लागणार आहे.
देणगी, वर्गणी ऐच्छिक असेल, यावर्षी मिरवणुकीवर बंदी घालण्यात आली आहे.

आरती, भजन,किर्तन याकरता गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार त्याचबरोबर शक्य असल्यास ऑनलाईन दर्शन सुविधा करावी.

शक्यतो शाडूची मूर्ती असावी आणि घरगुती मूर्ती शक्यतो घरीच विसर्जित करावी.
घराबाहेर करायचं असल्यास कृत्रिम विसर्जन हौदाचा वापर करावा, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांनी विसर्जन घाटावर येणं टाळावे.

 

Web Title : Pune Ganeshotsav | pune municipal corporation issue guidelines for ganeshotsav 2021 read all rules

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | पुण्यात सहायक पोलीस निरीक्षकावर (API) बलात्काराचा गुन्हा दाखल

Modi Governement | बदलली बाईकवर मागे बसण्याची पद्धत ! आता असा करावा लागेल प्रवास, जाणून घ्या काय आहे मोदी सरकारचा नियम

Pune News | अर्चना पाटील व तुषार पाटील यांचे काम बोलते – प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

Coronavirus | ‘कोरोना’चा उगम झाला ‘त्या’ वुहानमधील 1.10 कोटी रहिवाशांची चीन करणार पुन्हा Test