Pune Ganj Peth Crime | रागाने पाहिल्याच्या कारणावरुन पालघन व चाकुने मारहाण, चार जणांना अटक; गंजपेठेतील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Ganj Peth Crime | डोळे वटारुन बघीतल्याच्या करणावरुन चार जणांनी एका तरुणाला पालघन, चाकू व दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी खडक पोलिसांनी (Khadak Police) चार जणांवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार एच.पी. लोहियानगर, गंजपेठ येथे बुधवारी (दि.14) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडला आहे. (Pune Ganj Peth Crime)

याबाबत अनिकेत व्यंकटेश कोळी (वय-22 रा. एच.पी. लोहियानगर, गंजपेठ, पुणे) याने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन कुणाल गुळुंजकर, अतुल कांबळे, सोन्या कांबळे, आकाश कांबळे यांच्यावर आयपीसी 326, 324, 504, 34 सह आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी ऐकमेकांच्या ओळखीचे आहेत. अनिकेत याने आरोपींकडे डोळे वटारुन पाहिल्याचा राग मनात धरून अनिकेतला शिवीगाळ केली. तसेच हाताने लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. आरोपींनी फिर्यादी यांना पालघन, चाकु व दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विक्रम मिसाळ करीत आहेत.

मारहाण केल्याच्या कारणावरुन वाहनांची तोडफोड

कोथरुड : मारहाण केल्याच्या रागातून सात जणांच्या टोळक्याने दुकानाच्या शटरवर सिमेंटचे गट्टू मारुन दुकानासमोरील
सहा दुचाकी पाडून नुकसान केले. हा प्रकार बुधवारी (दि.14) मध्यरात्री दीडच्या सुमारास कोथरुड येथील जयभवानी नगर येथे घडला आहे. याप्रकरणी विजय गणेश ठोंबरे (वय-44 रा. पौड रोड, भुगाव) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी गौरव सचिन गायकवाड, सुयोग संदीप दवंडे, सुयश उर्फ चिक्या दत्तात्रय पोळेकर, साई विठ्ठल वाशिवले,
सुयश चव्हाण स्वराज बोडके, व सुमित मोहिते यांच्यावर आयपीसी 427, 141, 143, 147, 149 नुसार गुन्हा दाखल
केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत.
जयभवानी नगर येथे राहणारा सौरभ गाऊडसे याला काही मुलांनी मारहाण केली होती.
याच रागातून आरोपींनी फिर्यादी यांच्या दुकानावर सिमेंटचे गट्टु मारुन दुकानासमोर पार्क केलेल्या दुचाकी खाली
पाडून नुकसान केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP Leader Ajit Pawar | ”संपूर्ण परिवार विरोधात गेला तरी जनता माझ्यासोबत”, अजित पवारांचे भावनिक आवाहन, सुप्रिया सुळेंवर केली टीका…

Lok Sabha Elections 2024 | लोकसभेच्या तयारीला सुरुवात; लोकसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करा, पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Manoj Jarange Patil | जरांगेंनी नारायण राणेंना खडसावलं, ”वयाचा आदर करत होतो…आता मी पाणउतारा करेन”